पुलाची शिरोली येथील स्मशानभूमी मध्ये मांत्रिक व साथीदाराकडून अघोरी प्रकार घडल्याची क्लिप व्हायरल, ग्रामस्थात भीती, असले प्रकार रोखण्याची अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कॉम्रेड गिरीश फोंडे यांची मागणी
पुलाची शिरोली /प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुलाची शिरोली येथील स्मशानभूमीत रात्रीच्या वेळी घडलेला कथित अघोरी प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे यातील मांत्रिक कोणा कानडी व्यक्तीबरोबर संभाषण करत असल्याची व्हिडिओ क्लिप वायरल झाली आहे. याव्हिडिओमध्ये मांत्रिक व्यक्ती हातात लिंबू घेऊन दाहिनी मध्ये बसून काही पाच सहा नागरिकांची नावे घेत काहीतरी मंत्रोच्चार करताना दिसत आहे. तो स्मशानभूमीतील चक्क दाहिनी मध्ये बसून व्हिडिओ करण्यासही सांगत आहे.दुसरी व्यक्ती कानडी बोलणारी व्यक्ती व्हिडिओ करत आहे. त्यानंतर तो मांत्रिक “येथील आत्मा बाटलीत बंद केला आहे” असा दावा करत असल्याचेही या व्हिडिओ स्पष्टपणे ऐकू येते.मात्र हा प्रकार नेमका कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळेस घडला याची स्पष्ट माहिती बाहेर आलेली नाही. मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच काही वेळातच तो चर्चेचा विषय बनला आहे. ग्रामस्थांमध्ये मात्र या व्हिडिओ बाबतभीती निर्माण झाली असली तरी राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य युवा सचिव कॉम्रेड गिरीश फोंडे यांनी असले प्रकार रोखण्यासाठी समाजातून उठाव निर्माण करून अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची ठोस अंमलबजावणी आणि युवकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे काळाची गरज बनली असल्याचे नमूद केले आहे.

गावातील ती व्यक्ती कोण असावी?या बाबत तर्क वितर्क सुरू आहेत.अशा प्रकाराला वेळीच आवर घालण्याची गरज या निमित्ताने निर्माण झाली आहे. ही स्मशानभूमी नदी बाजूला विरळ वस्ती असणाऱ्या बाजूला असून वैरण चोरी करणाऱ्या लोकांकडून येथील विजेचे पथदीप ही ठेवले जात नाहीत. त्यामुळे त्या भागात अंधाराचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यासाठी या भागात पथदीप व सीसी टीव्ही बसविणे हे गरजेचे आहे .