स्मॅकने शिरोली गावची कचरा डेपोची जागा ताब्यात घेऊ नये ग्रामस्थांचे निवेदन

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे 

स्मॅकने शिरोली गावची कचरा डेपोची जागा ताब्यात घेऊ नये यासाठी गावातील सर्वपक्षीय जागरूक नागरिकांच्या वतीने ग्रामविकास अधिकारी गिता कोळी याना निवेदन देण्यात आले .या निवेदनात औद्योगिक वसाहतीमुळे गावासाठी अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत त्यांचे निरसन करावे व कचरा डेपोचा त्रास होत असेल तर शिरोली ग्रामपंचायत या डेपोच्या सभोववार पत्रे लावून ही जागा बंदिस्त करेल व याचा त्रास औद्योगिक वसाहतीला होणार नाही याचा पुरेपूर दक्षता घेईल आमच्या या न्याय मागणीचा स्मॅकने विचार न केल्यास पुढे गावच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे पुलाची शिरोली ( ता हातकणंगले ) गावचा संपूर्ण कचरा गेली 30 ते 40 वर्षापासून औद्योगिक वसाहतीच्या पश्चिमेकडील भागात एका मोठ्या खड्यामध्ये टाकत आहे. आता ही जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सातबारा पत्रकी आपली असल्याचे सांगत आहे. स्मॅकच्या वतीने या ठिकाणी कचरा टाकण्यास विरोध केला जात आहे म्हणून शिरोली ग्रामपंचायतने ती जागा त्वरित आपल्या ताब्यात घ्यावी यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत उद्योग मंत्री, पालकमंत्री यांना स्मॅकने औद्योगिक वसाहत कार्यालयात बोलावून निवेदन देऊन ही जागा आपल्या ताब्यात घेण्याबाबत हालचाली सुरु केल्या आहेत याबाबतीत आम्ही शिरोली ग्रामस्थ निवेदनातून औद्योगिक वसाहतीबद्दल बाबी निदर्शनास आणत आहोत .

१ शिरोली औद्योगिक वसाहत स्थापन होताना गावची शेकडो एकर जमीन औद्योगिक वसाहतीस दिली आहे. पण या जागेतील थोडीशी जागा शिरोली गावच्या कचरा डेपोसाठी औद्योगिक वसाहत का देऊ शकत नाही

2. या औद्योगिक वसाहतीमुळे गावातील कारखान्याचा ऍसिडयुक्त पाण्यामुळे गावचा सुंदर तलावाचे दुषित डबक्यात रूपांतर झाले आहे.

3. ज्या गावच्या जमिनी औद्योगिक वसाहतीसाठी आरक्षित केल्या आहेत त्या गावात लँड अफेकटेड (भृग्रस्त) गाव म्हणून औद्योगिक वसाहतीने स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा करावा असा कायदा आहे या उलट औद्योगिक वसाहतीला दूधगंगेचे थेट स्वच्छ व निर्जंतुक पाणीपुरवठा होतो तर शिरोली गावाला मात्र पंचगंगेचे दुर्गंधीयुक्त पाणी मिळते हा कुठला न्याय .

4. शिरोली औद्योगिक वसाहतीतील अनेक जागा फाउंड्री वेस्ट मुळे प्रदूषित झाले आहेत गावातील 50 एकर जागेत वीस ते पंचवीस फुटाच्या विषारी वाळूचे ढीग पसरले आहे. ही लाखो टन फाउंड्री वाळू औद्योगिक वसाहतीने गायरान जागेतून काढून घ्यावी.

5. औद्योगिक वसाहती मधून येणारा ओढा रासायनिक पाण्यामुळे प्रदूषित होऊन फेसाळतो आहे व त्या ओढ्याचे पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळते याची प्रदूषण महामंडळाने त्वरित चौकशी करावी. तसेच सध्या औद्योगिक वसाहती मधील 80% कामगार हे शिरोली गावात राहतात त्या सर्व कामगाराच्या पायाभूत सुविधा शिरोली ग्रामपंचायत पुरवते. मग या कामगार वर्गाचा कचरा औद्योगिक वसाहती मधील कारखानदारांची गोळा करून त्याची विल्हेवाट लावावी किंवा गावातील औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या सर्व कामगावर्गाची राहण्याची सोय कारखानदाराने करावी.

7. कोल्हापूर स्टील कारखान्याच्या ताब्यात असणारी शिरोली गावच्या हक्काची असणारी अंदाजे अकरा एकर जमींन कारखानदारांनी शिरोली ग्रामपंचायतिला परत द्यावी. 8 औद्योगिक वसाहती मधील अनेक कारखाने,फाउंड्री उद्योग यामुळे येथील हवा,पाणी आणि जमीन प्रदूषित झाली. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक जणांना टीबी,फुफुसाचे रोग असलेल्या रुग्णांची वाढ झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

9. हवा आणि जल प्रदूषण करणाऱ्या सर्व जबाबदार कारखान्यावर गावातील प्रमुख लोकांना सोबत घेऊन तपासणी करावी आणि प्रदूषण महामंडळाने कठोर कायदेशीर कारवाई करावी.

10.कारखानदारांना औद्योगिक वसाहतीतील त्या कचरा डेपोचा त्रास होत असेल तर शिरोली ग्रामपंचायत या डेपोच्या सभोववार पत्रे लावून सदरची जागा बंदिस्त करेल व याचा त्रास औद्योगिक वसाहतीला होणार नाही याचा पुरेपूर दक्षता घेईल आमच्या या न्याय मागणीचा स्मॅकने विचार न केल्यास पुढे गावच्या वतीने तीव्र

आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला .यावेळी जि प माजी सदस्य महेश चव्हाण , तंटामुक्त अध्यक्ष सतीश पाटील ,विठ्ठल पाटील, संभाजी भोसले , मधुकर संकपाळ, प्रशांत कागले , विनायक कुंभार, आरिफ सर्जेखान, शामराव पाटील, महंमद महात, मधुकर पदमाई, राजेंद्र खुटाळे , योगेश खवरे, दिलीप शिरोळे, मुकुंद नाळे , इरफान देसाई, संजय पाटील, रामचंद्र बुडकर आदिसह सर्वपक्षीय जागरूक नागरिक उपस्थित होते .

Leave a Comment

error: Content is protected !!