शिरोळ / प्रतिनिधी
हातकणंगले तालुक्यात जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे आमदार अशोकराव माने (बापू) यांनी आजवर कुणताही गट-तट न पाहता घरी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला निस्वार्थ भावनेने मदत केली आहे.कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांनी सातत्याने सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेत त्यांना न्याय मिळवून दिला.याच जनसेवेच्या आशिर्वादाने त्यांना हातकणंगले तालुक्यातून विधानसभेला प्रचंड मतांनी निवडून देण्यात आले.हा कार्याचा वारसा त्यांचे पुत्र डॉ. अरविंद माने यांनी प्रभाग २ मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडून येऊन समर्थपणे पुढे चालवला आहे.शांत, संयमी आणि नम्र स्वभाव, तसेच प्रत्येक अडचणीच्या वेळी लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची त्यांची खास शैली यामुळे प्रभागातील जनतेने त्यांच्यावर भरभरून प्रेम आणि विश्वास दाखवला.गेले पाच वर्षे त्यांनी विकासकामांचा धडाका लावत कोट्यवधींची कामे मार्गी लावली.स्वतःच्या प्रसिद्धीपेक्षा कामाला आणि लोकसेवेला प्राधान्य देणारे डॉ.अरविंद माने यांनी “कोण काय म्हणतं” याकडे दुर्लक्ष करत प्रत्येक सामान्य माणसाच्या घरात आपली ओळख निर्माण केली आहे.त्यांच्या या कार्यामुळे प्रभागात नवसंजीवनी निर्माण झाली असून, त्याच जनतेच्या विश्वासाच्या जोरावर आता त्यांच्या पत्नी सौ. सारिका माने या शिरोळ नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.सौ.सारिका माने यांना जनतेचा प्रचंड प्रतिसाद आणि विश्वास मिळत आहे. त्यांच्या नावाची चर्चा शहरात सर्वत्र सुरू असून, त्यांच्या प्रचाराला देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.माने कुटुंबाची पारदर्शक व दिलदार लोकसेवेची परंपरा, तसेच महिलांच्या विकासासाठी असलेली संवेदनशीलता ही सौ. सारिका माने यांची खास ओळख ठरत आहे. भाजपा पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारीमुळे शिरोळ शहरात विकास कामाला अधिक वेग येईल अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.