कृष्णा देशमुख सारखा लढवय्या आणि जनतेसाठी भांडणारा प्रतिनिधी नगरपरिषदेमध्ये हवा मतदारांची मागणी!

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शेतकरी प्रश्नांपासून ते शहरातील नागरी समस्यांवर गेली अनेक वर्षे प्रखरपणे आवाज उठवणारे आंदोलन अंकुश संघटनेचे कृष्णा देशमुख यांना प्रभाग १० मधून शिरोळ नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी मतदारांमधून होत आहे.ऊस दराचा प्रश्न असो, वीजबिलांवरील अन्याय असो वा नगरपरिषदेमधील मूलभूत सुविधांचा अभाव देशमुख यांनी वेळोवेळी आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला जाब विचारत सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला आहे.अनेक वेळा पोलिसी लाठीमाराला सामोरे जात असूनही त्यांचा संघर्ष कमी झालेला नाही. त्यामुळेच प्रभाग १० मधील नागरिकांना विश्वास आहे की, असा लढवय्या आणि जनतेसाठी भांडणारा प्रतिनिधी नगरपरिषदेमध्ये हवा.शहरातील रस्ते, नाल्या, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आदी प्रश्नांवर प्रशासन वेळकाढूपणा करत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांचे डोळे उघडण्यासाठी आणि जनतेचे प्रश्न थेट प्रशासनासमोर मांडण्यासाठी कृष्णा देशमुख यांच्यासारख्या ठाम भूमिकेच्या व्यक्तीची नगरपरिषदेमध्ये गरज आहे.नगरपरिषदेतील अनेक विकासकामांमध्ये होत असलेला भ्रष्टाचार, निधीचा अपव्यय तसेच प्रभागातील विकासकामांमध्ये होत असलेली दिरंगाई याकडे लक्ष वेधत देशमुख यांनी आतापर्यंत विविध माध्यमांतून प्रशासकीय हलगर्जीपणावर सडकून टीका केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे एक जनतेचा लढवय्या प्रतिनिधी म्हणून पाहिले जात आहे.सध्या प्रभाग १० मधील तरुणांपासून महिलांपर्यंत विविध स्तरांतील नागरिक देशमुख यांच्या संपर्कात असून त्यांच्या उमेदवारीसाठी संघटित प्रयत्न करत आहेत. “आमचा मतदारसंघ, आमचा नेता – कृष्णा देशमुखच हवा!” अशी एकमुखी भावना नागरिकांमध्ये दिसून येत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!