पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे
अज्ञात चोरट्याकडून पुलाची शिरोलीतील महामार्ग लगतच्या गणेश मंदिरा जवळचे घरातील धनत्रयोदशी निमित्त पुजलेले पाच तोळे दागिने तर टोप येथे शुक्रवारी समरजीत ट्रेडर्स या दुकानातून २५ हजाराची रोख रक्कम लंपास केली.याबाबत शिरोली पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की शिरोली गणपती मंदिराजवळ जगदीश वेलजी नरसिंगानी( वय ४३)हे आपल्या कुटुंबियासह राहतात. रविवारी १९ तारखेला रात्री धनत्रयोदशी निमित्त त्यांनी आपल्या घरातील ५० ग्रॅम वजनाच्या दोन पाटल्या पूजा पाठासाठी ठेवलेल्या होत्या.अज्ञात चोरट्याने जवळपास पाच लाखा रुपये किमतीच्या या दोन्ही पाटल्या लंपास केल्या आहेत.याबाबतची फिर्याद शिरोली पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. तर गुरुवारी सकाळी टोप येथील टोप वडगाव रस्त्यावरील समरजीत ट्रेडर्स हे हार्डवेअरचे दुकान फोडून अंदाजे २५ हजार इतकी रोख रक्कम लंपास केली. चोरटे तोंडाला रुमाल बांधून आले होते. त्यांचे चित्रीकरण सीसीटीव्हीत कैद झाले आहे.या दोन्ही चोऱ्या महामार्गालगतच झालेल्या आहेत. यात सात साधर्म्य असल्याने चोरटे महामार्ग लगतच चोरी करून निघून जात असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.या दोन्ही घटनेची नोंद शिरोली पोलीस ठाण्यात आज सोमवारी झाली आहे.