स्थानिक स्वराज्य संस्था महायुती म्हणून लढणार – नाम.चंद्रकांतदादा पाटील

Spread the love

शिरोळ येथे भाजपाचा कार्यकर्त्यांचा महामेळावा संपन्न

शिरोळ / प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने जीएसटीमध्ये कपात केल्यामुळे दिवाळीची खरेदी करीत असताना सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. राज्यात पावसामूळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यासाठी महायुती सरकारने ४२ हजार कोटीचे पॅकेज जाहिर केले असून नुकसान भरपाई मिळण्यास सुरूवात झाली आहे. आगामी निवडणूकीत महायुती सरकारच्या माध्यमातून लढविली जाणार असून ज्या जागा मिळतील त्या ठिकाणी कमळ चिन्हावरच निवडणूक लढविणार असल्याचे असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण , वस्त्रोउद्योग व संसदीयकार्य मंत्री चंद्रकातदादा पाटील यांनी केले.शिरोळ येथील समर्थ मंगल कार्यालय येथे शनिवारी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्त्यांच्या महामेळावा मेळावा पार पडला. या मेळ्याव्यात दुरध्वनीवरून मंत्री पाटील बोलत होेते. यावेळी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार्‍या तालुक्यातील पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले, केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तर राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भक्कम असे युती सरकार आहे. केंद्रात व राज्यात भाजपा भक्कम असल्याने येत्या निवडणूकीत भाजपा सर्व ताकदीने निवडणूकीला सामारे जाणार आहे.श्री. गुरूदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे म्हणाले, २००५ ,२०१९ ,२०२१ मध्ये शिरोळ तालुक्यावर महापुराचे संकट आले होते. या काळात गुरुदत्त शुगर्सने पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला. आलास परिसरातील नदीपलिकडील सात गावात महापूर काळात बाहेर पडण्यासाठी नागरिकांना कर्नाटक राज्याचा आधार घ्यावा लागत होता. त्यासाठी आम्ही नाम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून आलास ते अकिवाट दरम्यान पुलाची मागणी करून त्याचा पाठपुरावा केला. आमच्या प्रयत्नाला यश आले व पुलासाठी २३ कोटीचा निधी मंजूर झाला आणि त्याचे काम देखील सुरू झाले आहे. तसेच आगामी निवडणुक महायुतीच्या माध्यमातून लढविणार आहे. तसेच युती न झाल्यास आमची स्वबळाची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर म्हणाले, जयसिंगपूरनंतर शिरोळच्या नगराध्यक्षा या भाजपाच होणार आहेत. माधवराव घाटगे चाणक्यनितीचे आहेत. त्यामुळे त्यांनी दुरदृष्टी ठेवून सावकार मादनाईक यांना भाजपात घेतले आहे.आमदार अशोकराव माने, माधवराव घाटगे यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उभे करण्याची प्रेरणा दिली आहे. त्यांनी कधीही पदाची अपेक्षा केली नाही. मागील काळाता स्थानिक आघाडी करून त्यांच्या पाठबळावर आमदार निवडून आणण्याची किमया केली असून हा मेळावा तालुक्याला दिशा देणारा ठरेल.सावकार मादनाईक म्हणाले, गेली पंचवीस वर्षे सर्वसामान्य शेतकर्‍यांना न्याय देण्याचे काम आम्ही केले आहे. यापुढे माधवराव घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी हितासाठी भाजपाच्या माध्यमातून काम करणार आहे .मेळाव्याचे स्वागत व प्रास्ताविक भाजपाचे जिल्हा अध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर यांनी केले. यावेळी पंचगंगा साखर कारखान्याच्या माजी अध्यक्षा रजनीताई मगदूम,गुरुदत्त शुगरचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे , जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा डॉ. नीता माने,कुरुंदवाड चे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे , माजी नगरसेवक उदय डांगे, जिल्हा परिषदचे माजी सदस्य अरुणराव इंगवले, प्रसाद खोबरे , डॉ.अरविंद माने, अनिल डाळ्या, रमा फाटक, महेश देवताळे, शिवाजीराव माने-देशमुख, मुकुंद गावडे, शिवाजी जाधव – सांगले,संभाजी भोसले, दादासो कोळी , पोपट पुजारी , अन्वर जमादार, जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड नगरपरिषदचे भाजपचे नगरसेवक, तालुक्यातील विविध संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट –

या भाजपाच्या महामेळावा मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश कोषाध्यक्ष मिलिंद साखरपे, जयसिंगपूरचे माजी उपनगराध्यक्ष शैलेश आडके , माजी नगरसेविका आसावरी आडके , जयसिंगपूर नगरपरिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती सतीश हेगाण्णा , उदगावचे सरपंच सलीम पेंढारी , उपसरपंच सौरभ पाटील,आर.जी. वरेकर, कोळी राष्ट्रसंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. विजयराव कोळी यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी तसेच उदगाव,संभाजीपूर,उमळवाड, दानोळी,गौरवाड, औरवाड, आदी गावातील २०० हुन अधिक कार्यकर्त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला.

Leave a Comment

error: Content is protected !!