शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक १० मधून ओंकार अरुण गावडे यांना नगरपरिषदेच्या सभागृहात पाठवण्याचा निर्धार प्रभागातील तरुणांनी केला आहे. जनसामान्यांचा उमेदवार म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या गावडे यांना यावेळी प्रभागात सर्वाधिक मतांनी विजयी करण्यासाठी तरुणांनी जोरदार तयारी आतापासूनच सुरू केली आहे.ओंकार गावडे यांनी गत निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ मधून निवडणूक लढवली होती.त्यावेळी मतदारांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता,मात्र अल्प मतांनी त्यांचा पराभव झाला.मात्र या पराभवाने खचून न जाता जनतेचा कौल मान्य करून
त्यांनी सामाजिक आणि जनहिताच्या कामांना अधिक जोमाने सुरुवात केली.त्यांच्या शांत,नम्र स्वभावामुळे आणि सर्वांसोबत बांधिलकी जपणाऱ्या वृत्तीमुळे त्यांचा प्रभागात तसेच संपूर्ण शहरात चांगला जनाधार तयार झाला आहे.प्रभाग १० मध्ये गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी रस्ते,गटारे,पाणीपुरवठा,ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न,महिला सुरक्षेसंदर्भातील मुद्दे अशा अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.त्याची सोडवणूक करण्यासाठी युवकांनी स्वयंस्फूर्तीने एकत्र येत ओंकार गावडे यांना विजयी करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.”आपला नगरसेवक आपलाच माणूस असावा” या भावनेतून गावडे यांच्या समर्थनार्थ सोशल मिडिया पासून प्रत्यक्ष जनसंपर्कापर्यंत विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू झाले आहेत.विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व घटकांना बरोबर घेऊन चालणारा,कोणताही गाजावाजा न करता काम करणारा उमेदवार म्हणून ओंकार यांची प्रतिमा निर्माण झाली आहे.येत्या निवडणुकीत प्रभाग १० मध्ये चुरशीची लढत होणार असली तरी ओंकार गावडे यांचा आत्मविश्वास,नेत्यांचा विश्वास आणि जनतेचा पाठिंबा पाहता त्यांच्या विजय निश्चित मानला जात आहे.