कृष्ण नदीवरील मोठ्या पुलाचा भूमिपूजन संपन्न
आलास / प्रतिनिधी
गेल्या वीस वर्षापासून मागणी होत असलेल्या शिरोळ तालुक्यातील आलास- अकिवाट दरम्यान कृष्णा नदीवरील २३ कोटी रुपयांच्या पुलाचे भूमिपूजन समारंभ राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण,वस्त्रोद्योग व संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. आलास अकिवाट या पुलामुळे शिरोळ तालुक्यातील जनतेचे दळणवळण सुलभ व जलद होणार असून वेळेची बचत होणार आहे असल्याचा विश्वास नामदार पाटील यांनी व्यक्त केला.नामदार पाटील म्हणाले ,श्री गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे यांनी या पुलासाठी माझ्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले असून प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ आज होत आहे. श्री गुरुदत्त शुगर्स चे चेअरमन माधवराव घाटगे म्हणाले, या पुलामुळे सात गावातील ग्रामस्थांना महापुराच्यावेळी गुरुदत्त शुगर्सच्या निवारा छावणीमध्ये जाण्यासाठी मदत होणार आहे.आलास- अकिवाट दरम्यान होणारा पुल २७० मीटर लांब असून साडेसात मीटर रूंद होणार आहे. यामध्ये ३० मीटरचे नऊ गाळे असून पुलाच्या दोन्ही बाजूला महापुरात अडथळा निर्माण होऊ नये यासाठी सहा- सहा मीटरची बॉक्स उभारले जाणार आहेत. त्यामुळे महापुराची पाणी वाढले तरी या बॉक्समधून पुराची पाणी सरळरित्या जाणार आहे. शिरोळ तालुक्यातील नदीपलीकडील सात गावांना अकिवाट, टाकळीवाडी,दत्तवाड या गावांना व कर्नाटक राज्यातील बोरगाव, सदलगा या भागाला जोडण्यासाठी हा पुल महत्वाचा ठरणार आहे.यावेळी कार्यक्रमाला धैर्यशील माने,गुरुदत्त शुगर्सचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे, जिल्हा परिषदचे माजी सदस्य अरुणराव इंगवले,जि.प.चे माजी बांधकाम सभापती सावकार मादनाईक,भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन – नाईक निंबाळकर,महेश देवताळे ,डॉ. संजय पाटील,अन्वर जमादार, मुकुंद पुजारी , राजेंद्र दाईंगडे,रमेश यळगुडकर, आलासचे सरपंच सचिन दानोळे, उपसरपंच सोनाली कोळी यांच्यासह आलास,अकिवाट गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .