प्रभाग ८ मध्ये अनुभवी,शांत,संयमी आणि विश्वासू दीपक भाट यांच्या बाजूने कल 

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

 

शिरोळ नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष आणि आघाड्यांनी तयारीला सुरुवात केली असून, विविध प्रभागांमध्ये उमेदवार ठरवण्यासाठी चाचपणी सुरू आहे.प्रभाग क्रमांक आठमध्ये मात्र नागरिकांचा कल हा अनुभवी,शांत, संयमी आणि विश्वासू उमेदवाराच्या बाजूने असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर माजी ग्रामपंचायत सदस्य आणि 2003 ते 2008 दरम्यान शिरोळ ग्रामपंचायतीचे आरोग्य सभापती म्हणून काम पाहिलेले दीपक भाट यांचे नाव चर्चेत असून, त्यांच्या उमेदवारीची जोरदार मागणी मतदारांकडून होत आहे.आरोग्य सभापती असताना भाट यांनी परिसरातील स्वच्छता, पाणीपुरवठा,रस्ते दुरुस्ती,आरोग्य सुविधा यावर विशेष भर देत उल्लेखनीय कामगिरी केली होती.प्रभाग आठमधील नागरिकांच्या मते, दीपक भाट हे स्थानिक समस्यांची जाण असलेले,साधी राहणी आणि स्पष्टवक्तेपणामुळे लोकप्रिय ठरलेले व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी पूर्वीच्या कार्यकाळात नागरिकांच्या अडचणी त्वरित सोडवण्यावर भर दिला होता.त्यामुळेच आगामी निवडणुकीत नवीन चेहऱ्याला संधी देण्यापेक्षा अनुभवी आणि लोकांच्या मनात विश्वास निर्माण करणाऱ्या उमेदवारालाच संधी दिली पाहिजे,अशी मतदारांची ठाम भूमिका आहे.भाट यांनी देखील आपल्याला पुन्हा एकदा शहरासाठी काम करण्याची संधी मिळावी,अशी तयारी दर्शवली आहे.स्थानिकांच्या पाठबळामुळे त्यांच्या उमेदवारीसाठी मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे.यामुळे प्रभाग आठमधून दीपक भाट हे महत्त्वाचे उमेदवार ठरण्याची शक्यता अधिक आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!