शिरोळ / प्रतिनिधी
येथील नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १० मध्ये सौ. रेश्मा पुलकेश कांबळे यांना उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी प्रभागातील सुज्ञ मतदारांकडून होत आहे.सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या पुलकेश कांबळे यांचा मोठा जनसंपर्क असून, त्यांच्या कार्यशैलीचा सकारात्मक प्रभाव नागरिकांवर आहे.त्यामुळे त्यांच्या पत्नी सौ.रेश्मा कांबळे यांना निवडणुकीत संधी द्यावी, अशी मागणी स्थानिक पातळीवरून होत आहे.पुलकेश कांबळे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत, कोरोना व महापूर काळात केलेली निस्वार्थी सेवा यासह अन्य विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. प्रभागातील विविध समस्या ते वेळोवेळी प्रशासनापर्यंत पोहचवत आले आहेत.त्यांच्या या सक्रिय सहभागामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांच्या कुटुंबाविषयी विश्वासाचे वातावरण आहे.सौ.रेश्मा कांबळे या सुशिक्षित,शांत आणि अभ्यासू स्वभावाच्या असून, त्या देखील अनेक सामाजिक उपक्रमांत सहभागी असतात. महिलांचे प्रश्न,आरोग्य, स्वच्छता,पाणीपुरवठा, रस्ते आदी बाबतीत त्या विशेष लक्ष देतील, असा विश्वास मतदार व्यक्त करत आहेत.प्रभाग १० मध्ये सक्षम,कर्तव्यनिष्ठ प्रतिनिधीची गरज लक्षात घेता सौ. रेश्मा कांबळे या योग्य पर्याय ठरू शकतात, अशी भावना नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे पक्षाने त्यांना संधी द्यावी आणि परिवर्तनासाठी योग्य दिशा द्यावी,अशी मागणीही जोर धरू लागली आहे.