पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पुलाची शिरोली ग्रामपंचायतीचा दौरा करून गावातील अतिक्रमण मुक्त पानंद रस्ते योजनेचा प्रत्यक्ष पाहणी दौरा ब्रह्मानंद पानंद येथे केला.यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीला संबंधित अंमलबजावणीसाठी आवश्यक सूचना दिल्या.
दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी साहेबांनी स्मशानभूमीची जागा,घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प तसेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीची माहिती घेतली. त्याचबरोबर त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. जिल्हाधिकारी साहेबांचा सत्कार लोकनियुक्त सरपंच पद्मजा करपे यांच्या हस्ते करण्यात आला.प्रांताधिकारी दीपक शिंदे यांचा सत्कार बाजीराव पाटील व प्रकाश कौंदाडे यांच्या हस्ते,तर अप्पर तहसीलदार महेश खिलारी यांचा सत्कार अविनाश कोळी यांनी केला.नायब तहसीलदार सूर्यवंशी यांचा सत्कार ग्राममहसूल अधिकारी महेश सूर्यवंशी व मंडळ अधिकारी सीमा मोरये यांनी केला.यानंतर जिल्हाधिकारी येडगे यांनी श्री काशिलिंग बिरदेव मंदिर येथे भेट देत दर्शन घेतले.यावेळी बहुरूपी समाजातील नागरिकांना जातीचे दाखले व शिधा पत्रिकांचे वाटप करण्यात आले.तसेच लक्ष्मीमुक्ती योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सातबारा उताऱ्यांचे वितरण करण्यात आले.याप्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी गीता कोळी,ग्राममहसूल अधिकारी नागेश तोंदरोड, सहाय्यक कृषी अधिकारी पालकर,मंडळ अधिकारी मोरये, मा.उपसरपंच बाजीराव पाटील,अविनाश कोळी,प्रकाश कौंदाडे,कमल कौंदाडे,महसूल सेवक संदीप पुजारी तसेच ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.