“मोठी बातमी” सौ.सारिका माने यांची उमेदवारी भाजपकडून की इतर आघाडीकडून? चर्चेला उधाण

Spread the love

शिरोळ | प्रतिनिधी

 

शिरोळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, भाजपचे माजी नगरसेवक आणि महाराष्ट्र प्रदेश राज्य परिषदेचे सदस्य डॉ.अरविंद माने यांच्या पत्नी सौ. सारिका अरविंद माने या प्रबळ उमेदवार म्हणून चर्चेत आहेत.मात्र त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमधून भाजपचा लोगो आणि कमळ हे चिन्ह गायब राहिल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपने देशभरात ‘कमळ’ चिन्हावर निवडणुका लढवण्याचा ठाम निर्णय घेतलेला असताना,पक्षाच्या निष्ठावान सदस्याच्या पत्नीच्या प्रचारात भाजपचा उल्लेखही न करणे,हा मुद्दा सध्या शिरोळच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे.काही कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली असून,डॉ.माने हे भाजपमध्ये असूनही सौ. माने यांची उमेदवारी अन्य पक्षाकडून असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.डॉ.अरविंद माने हे भाजपचे जुने कार्यकर्ते असून,त्यांनी पक्षासाठी अनेक वर्षे काम केले आहे.मात्र सध्या त्यांच्या पत्नीच्या प्रचारात भाजपशी संबंधित कोणताही उल्लेख नसल्याने विविध तर्क वितर्क लढवले जात आहेत.विशेष म्हणजे,डॉ.अरविंद माने यांचे वडील डॉ.अशोकराव माने हे जनसुराज्य पक्षातून हातकणंगले मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते.त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत सौ. सारिका माने या भाजप,जनसुराज्य की अन्य कोणत्या आघाडीकडून निवडणूक लढवणार,याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.दरम्यान, 18 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भाजपच्या शिरोळ मेळाव्यानंतर पक्षाची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.त्या वेळी सौ. माने यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाणार की नाही, यावर शिक्कामोर्तब होऊ शकते.त्यामुळे पुढील राजकीय समीकरणे काय आकार घेतील,याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.”

Leave a Comment

error: Content is protected !!