पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुलाची शिरोली येथीली शिवराय तालीम समोरील युवक अनिस मौला देसाई (वय २४) यांने आपल्या राहत्या घरातील छताचे फॅनला गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की अनिस देसाई हा सांगली फाटा येथील एका शोरूम मध्ये कामाला होता. परंतु गेल्या पंधरा दिवसापासून ती नोकरी सोडून तो एमआयडीसी येथे कामाला जात होता. त्याचे वडील मौला देसाई हे गेल्या ४० दिवस जमात मध्ये गेले होते. आज त्यांचा शेवटचा दिवस होता. सकाळी आईने केलेला नाष्टा घेऊन तो त्यांना देऊन आला. त्यानंतर स्वतः नमाज पडून आला.तो तीन दिवस जमात मध्ये जाऊन नुकताच आला होता. तो नमाज पडून आला. आई पेपर वाचत असतानाच त्याने फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केले. तो अतिशय शांत स्वभावाचा होता. त्याचे आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापुरातील सरकारी रुग्णालयात नेण्यात आला. रात्री उशिरा त्याच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई-वडील, बहिण भाऊ असा परिवार आहे.