शिरोळमध्ये श्री भरत अर्बन को -ऑप बँकेचा ४२ व्या वर्धापन दिनानिमित्त ग्राहक मेळावा उत्साहात
शिरोळ / प्रतिनिधी
श्री भरत बँकेने शिरोळ सारख्या ग्रामीण भागात अनेक उद्योग व्यवसायासाठी अर्थसहाय्य केले आहे. त्यामुळे नव्या उद्योग व्यवसायाला व विकासाला चालना मिळाली आहे. या बँकेच्या लौकिकात सभासद ग्राहकांचा मोठा वाटा असून ग्राहकांचा मिळणारा प्रतिसाद, बँक कर्मचारी व व्यवस्थापनाच्या उत्कृष्ट कामकाजामुळे बँकेच्या शाखेचा विस्तार वाढला आहे. राज्यात बँकेचा आणखीन विस्तार होण्यासाठी लागेल ते सहकार्य करू ,असे मत आमदार डॉ अशोकराव माने यांनी व्यक्त केले. येथील श्री भरत अर्बन को -ऑप बँक शिरोळ शाखेचा ४२ वा वर्धापन दिनानिमित्त सभासद ग्राहक मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन डॉ श्रीवर्धन पाटील होते. शिरोळ शाखा अधिकारी पी बी तावदारे यांनी स्वागत केले. बोर्ड ऑफ मॅनेजमेंट अध्यक्ष पै विठ्ठल मोरे यांनी प्रास्ताविक भाषणात बँकेची प्रगती सांगितली.चेअरमन डॉ श्रीवर्धन पाटील म्हणाले, श्री भरत अर्बन बँकेच्या स्थापनेपासून शिरोळ व परिसरातील अनेकांनी सहकार्य केले आहे. या बँकेनेही विश्वासार्हता जपली असून बँकेच्या कामकाजावर ग्राहकांचा विश्वास निर्माण झाल्याने बँकेच्या ठेवी वाढल्या आहेत. यावर्षी कर्ज खाती कमी आहेत. बँकेचे ग्राहक, ठेवीदार यांच्यासह सर्वांनी दिलेला प्रतिसाद कौतुकास्पद आहे.यावेळी आमदार अशोकराव माने, दत्त कारखाना संचालक अनिलराव यादव, युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव , माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. विविध क्षेत्रात पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ दगडू माने, मोहन माने , प्रविण माळी यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास दत्त कारखाना उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील , संचालक दरगु गावडे, व्हाईस चेअरमन अजित पाटील, संचालक अशोक रुणवाल ,श्रेयश लडगे ,धनंजय मुळीक ,रावसाहेब कांबळे, कलगोंडा पाटील, श्रीमती सरोजिनी घेवारी, एस बी जगनाडे ,बी ए नरदे, ए आर कुलकर्णी , बी ए आरसगोंडा यांच्यासह व्यवस्थापक मंडळाचे ए जे उगारे, बी ए नरदे, ए आर कुलकर्णी, आर व्ही ढाले आदि उपस्थित होते. संचालक धनंजय मुळीक यांनी आभार मानले.