दुर्गामाता दौंड मध्ये शिस्त संस्कृती राष्ट्रभक्ती एकजुटीचा संगम शिरोलीकरांचे वेधले लक्ष
पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे
राष्ट्र प्रेमाची भावना जागृत करण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे आयोजन.शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान फुलाची शिरोली तर्फे घटस्थापना ते विजयादशमी या काळात दररोज पहाटे साडेपाच वाजता ग्रामपंचायत च्या प्रांगणात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस जलाभिषेक करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून प्रेरणा मंत्र व ध्येय मंत्र म्हणून दवडीस सुरुवात होते ही दौड फुलाची शिरोली गावातील सर्वच भागातून दौड काढली जाते गेली 35 वर्षे हा उपक्रम राबवण्यात येत आहे २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर या काळात दुर्गामाता दौडचे आयोजन केले आहे.
संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली चालू केलेली दुर्गा माता दौड नवरात्रीच्या काळात युवकांमध्ये राष्ट्रप्रेम जागृतीसाठी दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात येते या दवडीच्या अग्रभागी भगवा ध्वज घेतलेला युवक, युवती, मानाची भवानी तलवार युवक युतीच्या हातामध्ये असते व त्यांच्या पाठीमागे धारकरी डोक्याला भगवे फेटे व मुखा मध्ये देशभक्ती राष्ट्रभक्ती पर गीतांच्या गायनासह जय भवानी जय शिवाजी दुर्गा माता की जय काली माता की जय जय बजरंग बली अशा घोषणा देत दौडीमध्ये सहभागी असलेले हजारो तरुण लहान मुले धारकरी युवक युती अबाल वृद्ध मार्गक्रम करीत असतात ज्या भागांमध्ये दौडीचे आयोजन असते त्या भागांमध्ये रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी फुलांच्या पायघड्या व जागोजागी ध्वजाचे व भवानी तलवारीचे महिलांकडून औक्षण केले जाते दररोज गावातील प्रत्येक मंदिरासमोरून प्रत्येक भागातून देव देश धर्म यांची गीते म्हणत दुर्गा मातेचा जागर करत ही दौड निघते दसऱ्याच्या दिवशी याची सांगता देशावरची व्याख्या देऊन मंदिरात प्रसाद घेऊन पूर्ण होते या दौडीचे नियोजन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठल पाटील जिल्हा कार्यवाहक सुरेश यादव तालुका कार्यवाहक अर्जुन चौगुले व त्यांचे सहकारी सचिन यादव संग्राम चौगुले संदीप जाधव प्रसाद नलावडे सौरभ जोशी प्रदीप काळे युवराज चव्हाण नितीन चव्हाण हे करत असतात