अतिग्रे येथे माजी सरपंच दिव्यांग निराधार भव्य निर्धार मेळावा

Spread the love

अतिग्रे येथे माजी सरपंच व दिव्यांग निराधार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय परिषद संपन्न

माजी सरपंच व दिव्यांग निराधार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अतिग्रे येथे माजी सरपंच दिव्यांग निराधार यांचा भव्य निर्धार मेळावा व परिषद पार पडली,परिषदेचे स्वागत अध्यक्ष म्हणून एडवोकेट चिंतामणी कांबळे यांची निवड करण्यात आली होती तर कार्याध्यक्ष संदीप सूर्यवंशी अध्यक्षस्थानी मनीषाताई शिंदे होत्या .परिषदेचे मुख्य संयोजक म्हणून जयसिंग कांबळे यांनी काम पाहिले.सदर परिषदेवेळी 300 पेक्षा जास्त माजी सरपंच व निराधार दिव्यांग प्रतिनिधी उपस्थित होते .यावेळी बोलताना ऍडव्होकेट चिंतामणी कांबळे स्वागतातील म्हणाली की .माजी सरपंच हे गावाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणारे लोकप्रतिनिधी असतात पण त्यांचा प्रतिधित्वाचा काळ संपल्यानंतर त्यांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही अथवा पेन्शन किंवा तत्सम लाभ मिळत नाहीत .या संदर्भात माजी सरपंचांना पेन्शन मिळावी सर माझी सरपंच त्यांच्या कुटुंबीयांनामोफत उपचार मिळावेत मुंबई या ठिकाणी त्यांच्यासाठी विशेष सुविधा मंत्रालयाने कामासाठी उपलब्ध होईल . त्यांना विविध शासकीय प्रवासांमध्ये मोफत प्रवास मिळावा या व अशा विविध मागण्यांसाठीमोठे जनआंदोलन उभे करून शासनाचे डोळे उघडावे लागतील यासाठी सगळ्यांनी संघटित राहूया असे आव्हान एडवोकेट चिंतामणी कांबळे यांनी केले.कार्याध्यक्ष संदीप सूर्यवंशी म्हणाले की आपण सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी यांना या चळवळीमध्ये सहभागी करून घेऊन हा लढा अधिक विभाग स्वरूपात उभा करूया व आपले प्रश्न सोडवूया .सदर वेळी मार्गदर्शन करण्यासाठी खासदार धैरशील माने उपस्थित होते .लोकशाहीचा मूलभूत पाया म्हणजे गावचे सरपंच आहे त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विविध शासन दरबारी आम्ही प्रयत्न करू अशी आश्वासन त्यांनी यावे दिले .तर यावेळी उपस्थित असणारे आमदार अशोकराव माने यांनी संघटित प्रयत्न करून माजी सरपंचांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू असे सांगितले.सदर वेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केली .माजी सरपंच सानिया सुतार .मंगल मिंचेकर .गजानन जाधव . राजश्री रूकडीकर .अनिल शिरोळकर .पद्मिनी शिंगे .या व इतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाचे आभार जयसिंग कांबळे समिती उपाध्यक्ष यांनी मांडले .

Leave a Comment

error: Content is protected !!