प्राथमिक आरोग्य केंद्र, ही नाईट हॉस्पिटल, डी. वाय. पाटील हॉस्पिटल व हृदया कॅन्सर हॉस्पिटलचा सहभाग
पुलाची शिरोली / कुबेर हंकारे
पुलाची शिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ या अभियानाचा कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमाचे उद्घाटन शिरोली ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सौ.पद्मजा कृष्णात करपे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात ही नाईट हॉस्पिटलचे डॉ.विजयकुमार बरगे, डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. तेजश्री तहसीलदार व त्यांची टीम, तसेच हृदया कॅन्सर हॉस्पिटलचे डॉ.श्रीनाथ कुलकर्णी आणि त्यांच्या टीमने सहभाग घेतला.या अभियानाअंतर्गत स्त्रीरोग, नाक-कान-घसा, त्वचा रोग,मानसिक आजार,हिमोग्लोबिन तपासणी यांसारख्या विविध आरोग्य विषयक तपासण्या करण्यात आल्या.या आरोग्य तपासणी शिबिरात एकूण ६५७ लोकांची तपासणी करण्यात आली तसेच आंबा कार्ड देखील तयार करण्यात आले. जिल्हाधिकारी अमोल येडगे व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जानवी फाउंडेशन कोल्हापूर, श्री यमुनाबाई चॅरिटेबल ट्रस्ट व प्रतिज्ञा नाट्यरंग संध्या यांच्या सहकार्याने निक्षय पोषण किट्स क्षय रुग्णांना वाटप करण्यात आले. हे किट्स सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते देण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जेसिका अँड्रोज, सर्व आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, व अंगणवाडी सेविका यांनी विशेष परिश्रम घेतले.