भक्तांच्या हाकेला धावणार शिरोलीचे ग्रामदैवत काशिलिंग बिरदेव 

Spread the love

पुलाची शिरोली / कुबेर हंकारे

 

साधारणपणे २०० ते २२५ वर्षापूर्वीची हकिकत आहे. सध्या आपण ज्याला हाळ म्हणून ओळखतो, तो पंचगंगा नदीकाठच्या अग्नेय दिशेस असणाटा भाग. पूर्वी बरीच वस्ती असलेला भाग,जुन्या काळी महापुरातून जी माणसे वाचली, त्यांनी जी वस्ती वसवली, त्या भागात झोपड्या बांधूनच ते राहिले.काही दिवसांनी म्हणजेच १८५० च्या सुमारास अचानक आग लागून संपूर्ण गाव आगीत भस्मसात झाले. पुढे मात्र येथे कौलारु घरे बांधण्यात आली. त्यावेळचे संपूर्ण गाव म्हणजे सध्याचा बी वॉर्ड व ए वॉर्डचा काही भाग.शिरोलीचे ग्रामदेवत काशिलिंग बिरदेव देवाची दसऱ्या दिवशी पालखीतून मिरवणूक शिरोलीच्या ग्रामस्थांचे आराध्य दैवत म्हणजे काशिलिंग बिरदेव हे गावाच्या उत्तरेस आहे बिरदेव मंदिर शिरोली गावचे प्रमुख ग्रामदेवत म्हणून ओळखले जाते या बिरदेवा बाबतीत एक आख्यायिका आहे बिरदेव मूळ शिरोली गावचा नसून इंचलकरंजी येथील आहे वन शट्टी सोडगे पुलाची शिरोली येथील माळवाडी वर राहत होते ते जमीन कसं होते त्या जमिनीचा खटला इंचलकरंजी येथील कोर्टामिध्ये तारीख चालू होती त्यावेळी जाण्यास कोणतेही साधन नसल्यामुळे ते पायी चालत इचलकरंजीला जात असे पहिल्याच तारखेला वनशट्टी सोडगे हे इचलकरंजी येथे गेले असता मुक्काम कोठे करायचा हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न होता त्यावेळी ते राजवाड्याच्या समोर असलेल्या कोर्टाच्या बाजूला असलेल्या बिरदेवाचे मंदिर त्यांना दिसले ते मंदिर पाहून तेथील काही लोकांना विचाले की मी येथे मुक्काम केले तर चालेल का रात्रभर तेथे ते झोपले सकाळी उठल्यानंतर कोर्टामध्ये तारखेस हजर राहिले त्यानंतर पुढील तारीख एक महिन्याने देण्यात आली असे बारा वर्षे चालू राहिले पहिली तारीख झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की आपण देवाच्या मंदिरामध्ये मुक्कामास राहिलो पण आपण त्या देवास काही देत नाही असे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दुसऱ्या तारखेला जाताना मूठभर भात खिशामध्ये घालून नकाने सोलीत शिरोली ते इंचलकरंजी पर्यंत चालत जात होते चालत जात असताना तो भात सोलत होते तो सडलेला भात वेगळ्या खिशात तांदूळ जमा करत होते तेथे गेल्यानंतर ते तांदूळ उशाला ठेवून रात्री मुक्काम करून सकाळी उठून आंघोळ करून तीन दगडांची चूल करून पुजाऱ्यांच्याकडून भांडे घेऊन त्यामध्ये भात शिजवून त्याचा नैवेद्य देवाला दाखवून दर्शन घेऊन तारखेचे टाइमिंग झालं की कोर्टामध्ये हजर होत असे कोर्टाने पुढची तारीख दिल्यानंतर पुन्हा मंदिरामध्ये येत असे आणि शिजवलेला भात आपण स्वतः प्राशन करायचे पोट भरुन यायचे येताना पायी चालत शिरोली मध्ये यायचे असे करता करता बारा वर्षे निघून गेली सोडगे कुटुंबियातील पूर्वज नाथा वनशेट्टी सोडगे हा धार्मिक व श्रद्धाळू होता बारा वर्षे पूर्ण झाल्यानंतर वनशेट्टी यांनी हे देवाला म्हणाले गेली बारा वर्ष मी नित्य नियमाने कोर्टा ची तारीख खेळत आहे देवा माझ्या संसाराचे फार मोठे नुकसान होत आहे तरी आपण या खटल्याचा निकाल माझ्यासारखा लागू दे असे वन शेट्टी यांनी देवास साखडे घातले निकाल माझ्या बाजूने लागला तर मी मरेपर्यंत तुमच्या दर्शनासाठी महिन्याला येईल असे देवास वचन दिले.त्यानंतर बिरदेव वन शेट्टी यांच्या नवसाला पावले व खटल्याचा निकाल त्यांच्या बाजूने लागला निकाल आपल्या बाजूने लागल्यामुळे फार मोठा आनंद झाला त्यांनी सहकुटुंब जाऊन देवाचे दर्शन घेतले त्यावेळेस वन शेट्टी यांनी देवास सांगितले की मी तुमच्या दर्शनासाठी प्रत्येक महिन्याला इथपर्यंत येणारच तुम्ही मला पावला आहात असे देवा सांगुन शिरोली येथे आले त्यानंतर नित्य नियमाने वनशेट्टी महिन्याची वारी करू लागले असे करता करता आणि बरीच वर्षे निघून गेली त्यामुळे बिरदेवालाच वन शेट्टी यांचीदया आली व देव बोलले तुझे फार हाल होत आहेत तर मीच तुझ्या गावाला येतो तुझी भक्ती मला मान्य आहे.आता तू थकला आहेस तरी तू इथे येण्याचे कष्ट करू नकोस मी तुझ्या गावी येतो भक्त म्हनाला तुम्ही येणार हे खर आहे पण मला तुम्ही आल्याचं कसं कळणार आणि मला ओळखणार कसं त्यावेळी देव म्हणाले ज्या ठिकाणी येणार आहे ती खुण सांगतो नीट ऐकून घे बोरी बाभळ बेटाला फडाच्या तटाला वारुळाच्या खनाला आणि कमळाच्या बनाला अशा ठिकाणी ज्यावेळी तुझी वांज असलेली कपिला गाय रात्री बारा वाजता तिचे दावे आपोआप सुटून कपिला गाय हंबरत ओरडत पळेल तसे तुम्ही त्या कपिला गायीच्या पाठीमागून या आणि जिथे कपिला गाय थांबेल कपिला गाईला पान्हा फुटेल गाईच्या स्तनातून दूध गळू लागेल तेव्हा मी ज्या रुपामध्ये गाईचे दूध प्राशन करीन ते रूप माझेच असेल असे सांगितले बिरदेवाने दूध सर्पाच्या रुपात प्रशान केले ते दूध प्राशन करीत असताना तू समजून जा की मीच तेथे आलो आहे आणि तुझ्या कपिला गायीचे दूध प्राशन करीत आहे जिथे गाईचे दूध प्राशन करीन त्या ठिकाणी माझी स्थापना कर असं सांगून देव अदृश्य झाले दुसऱ्या दिवशी शनिवार होता देवाने त्याच दिवशी यायचं ठरवलं काकडे गावी असणाऱ्या अंतयर्यामी मसोबा देवास हे समजलं त्यांनीही बिरदेवां बरोबर शिरोलीस येण्याचा आग्रह धरला दोघेही शिरोलीला आले बिरदेव म्हसोबास म्हणाले तू गावाच्या वेशी बाहेर इथे वास्तव्य कर मी गावात वास्तव्य करतो मसोबास वेशी बाहेर थांबवलं ते म्हसोबाचे मंदिर राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्वेस आहे बिरदेव गावामध्ये आले आहेत हे गावातील लोकांना सोडगे यांनी सांगितले असता ते गावातील लोकांना पटत नव्हते त्यावेळेस सोडगे यांनी बिरदेवास विचारणा केली तेव्हा तुम्ही आल्याची वार्ता सर्व गावकऱ्यांना सांगितले तरी त्यांना पटत नाही आता मी काय करू तुम्ही आल्याचे त्यांना कसे पटवून देऊ त्यानंतर बिरदेव सोडले यांना म्हणाले आता तुम्ही थांबा पुढे श्रावण महिना आहे श्रावण महिन्यामध्ये तुमच्या गावचे ग्रामदैवत घोडेगिरी हे आहे तुमचे गावकरी श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवार हा तुमच्या गावचा सण आहे त्यावेळेस तुझे गावकरी तेथे जमा होतील व तुझ्या ग्रामदैवताला आंबील व नैवेद्य घेऊन ज्या वेळेस जातील त्यावेळी मी माझा अस्तित्वाचा चमत्कार दाखवून देईल त्यावेळेस फक्त तू माझ्या ठिकाणाला उभे रहा असे बिरदेवाने सोडगे यांना सांगितले त्यावेळेस देवांनी सर्व गावकऱ्यांच्या हातातील नैवेद्य व आंबलीने भरलेल्या घागरी सर्वकाही खाली पाडले उध्वस्त केले सर्व गावकरी भयभीत झाले व असे का घडले याचा विचार करू लागले त्यावेळेस सोडगे तेथे गेले व म्हणाले मी तर‌ पहिल्यापासून सांगत होतो येथे बिरदेव आले आहेत त्यांना तुम्ही देव माना सर्व गावकऱ्यांचे भले होईल असे सांगितले त्यावेळेस सर्व गावकऱ्यांनी त्यांना विचारले की तुझा देव कुठे आहे त्यावेळी सोडगे म्हणाले चला तुम्हाला दाखवतो त्यावेळेस सोडगे यांनी सर्व गावकऱ्यांना तळ्याच्या काठाला घेऊन आले आणि देवास वंदन करून देवाला म्हणाले सर्व गावकरी तुम्हास बघण्यास आतुर आहेत जसे तुम्ही मला सर्पाच्या रुपात दर्शन दिले आहे तसेच तुम्ही गावाला तुमचे दर्शन द्यावे अशी विनंती केली तेव्हा बिरदेवांनी पुन्हा सर्पाच्या रुपात सर्व शिरोलीकरांना दर्शन दिले त्यानंतर सर्व शिरोलीकरांचा बिरदेवाच्या अस्तित्वावर विश्वास बसला त्यानंतर सर्व शिरोलीकर बिरदेव ग्रामदैवत म्हणून मानू लागले.बिरोबाची प्रतिष्ठापना केली त्या ठिकाणी थोड्या दिवसांनी मंदिर बांधले गेले त्यावेळी पासून नित्यनियमाने मंदिरामध्ये पूजा अर्चा चालू झाली व सर्व शिरोली करांची अपार श्रद्धा कोणताही सण असू दे प्रत्येक सणाला बिरदेवाला नैवेद्य नारळ अशी प्रथा चालू झाली त्याचबरोबर नवरात्र उत्सव ही चालू झाला नवरात्राचे नऊ दिवस पहाटे पाच वाजता देवाची आरती त्यानंतर सकाळी अकटा वाजता व सायंकाळी सात वाजता त्यानंतर रात्री बारा वाजता या नवरात्र उत्सवामध्ये हा कार्यक्रम चालू झाला खंडे नवमीच्या पहाटे देवाची भाकणूक व हेडाम त्यानंतर सायंकाळी चार वाजता गावातील सर्व मानकर यांना बोलावून मसोबाची पालखी बिरदेवाच्या मंदिरामध्ये आल्यानंतर दोघांची भेट होऊन सोने लुटण्याच्या दिवशी देवाची पालखी गावातून फिरुन ग्रामस्थांच्या भक्त परिवारा समवेत दसरा मैदानात जाते.

Leave a Comment

error: Content is protected !!