पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
शिये ता. करवीर येथील महावितरण कंपनीकडून गावातील घरांमध्ये कोणतीही परवानगी न घेता स्मार्ट मीटर बसवलेचा जाब विचारत निषेध करणाऱ्या २० जणांवर शिरोली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद सरकार तर्फे निलेश मच्छिंद्र कांबळे शिरोली पोलिस यांनी दिली आहे .अधिक माहिती अशी की अपर जिल्हादंडाधिकारी, कोल्हापूर यांचा बंदी आदेश लागू असताना शिये ता. करवीर येथे जमाव करुन सोमवारी सकाळी सव्वा अकरा वाजण्यासुमार महावितरण विज उपकेंद्र शिये येथील कार्यालया समोर स्मार्ट मिटर विरोधात आंदोलन करत “बेकायदेशीर स्मार्ट मीटर बसवण्या-या महावितरणचा धिक्कार असो”, “अरे या महावितरणचे करायचे काय, खाली डोके वर पाय”, “चोर है महावितरण बसवलेली स्मार्ट मीटर काढलीच पाहिजे” अशा घोषणा देत, महावितरण विज कार्यालयाचे समोर जमीनीवर झोपले म्हणून अँड. माणिक शिंदे , बाजीराव पाटील , जयसिंग पाटील दयानंद कांबळे , रणजित कदम , शहाजी काशिद , पाडुरंग मगदुम , उत्तम पाटील , बाबामो गोसावी व त्यांचे इतर साथीदार १० ते १५ यांच्यावर शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .