शिरोळ / प्रतिनिधी
असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स अॅन्ड अर्किटेक्ट्स या संस्थेच्या वतीने इंजिनिअर्स डे व वार्षिक सर्वसाधारण सभा जयसिंगपूर येथील हॉटेल नमोश्री येथे दिनांक २१ सप्टेंबर २०२५ रोजी उत्साहात पार पडली. दीपप्रज्वलन व सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.अध्यक्ष इंजि. नितीन शेट्टी यांनी संस्थेच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली आणि प्रमुख पाहुणे आर्कि. प्रमोद चौगुले यांचे स्वागत केले. आर्कि. हेमंत पंडित यांनी सर विश्वेश्वरय्या यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. असोसिएशनचे सदस्य इंजि. रामप्रसाद पाटील यांना बिल्डर असोसिएशन व क्रीडाई यांच्या गुणवंत अभियंता पुरस्कार मिळाल्याबद्दल आर्कि. प्रमोद चौगुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मा. इंजि. किशोर पाटील यांचा नोंदणीकृत व्हॅल्युएटर परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाल्याबद्दल व मा. श्री. शशिकांत चव्हाण यांचा असोसिएशनला केलेल्या योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.कार्यक्रमात सचिव इंजि. स्वप्नील ढेरे यांनी मागील वर्षभरातील कार्याचा आढावा घेतला. उपस्थित सदस्यांना लाईफ मेंबरशिप सर्टिफिकेट वितरित करण्यात आले. इंजि. गणेश आरगे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.आर्कि. प्रमोद चौगुले यांनी त्यांच्या ग्रीन बिल्डिंग प्रकल्पांची माहिती स्लाईड शोद्वारे सविस्तर दिली. ग्रीन बिल्डिंग ही काळाची गरज असून पर्यावरणपूरक बांधकामाचे महत्व त्यांनी उलगडून दाखवले.अध्यक्ष इंजि.नितीन शेट्टी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू प्रधान यांनी केले तर आभार सचिव स्वप्नील ढेरे यांनी मानले. यावेळी उपाध्यक्ष सुजित पाटील, खजिनदार लक्ष्मण भोसले, संचालक विनोद मुळीक, रणजीत माने, प्रथमेश पाटील, सौरभ घाटगे यांच्यासह असोसिएशनचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.