आळते / प्रतिनिधी
आळते ता.हातकणंगले येथील मूळ रहिवासी आणि सध्या जयसिंगपूर येथे वास्तव्यास असलेले कृषी अधिकारी अजित ओमाणा कोठावळे (वय ४९) यांनी आजारपणाला कंटाळून आपल्या मूळ गावी असलेल्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज सोमवार (दि.२२) सप्टेंबर रोजी घडली.या घटनेने आळते परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.कोठावळे हे शिरोळ कृषी विभागात अधिकारी पदावर कार्यरत होते. नुकतीच त्यांची बदली राधानगरी येथे झाले असल्याची माहिती समोर आली आहे. आज,सूट्टी असल्याने ते आळते येथे आले असता घरी बेडरूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.काही दिवसांपासून ते आजाराने त्रस्त होते.या आजारामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते.मात्र,प्रकृतीमध्ये अपेक्षित सुधारणा न झाल्यामुळे ते मानसिकदृष्ट्या खचले होते,अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.सदर घटनेची माहिती हातकणंगले पोलिसांना देण्यात आली.पोलिस घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला असून,मृतदेह समर्थ रूग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.