शिरोळ या ठिकाणी झालेल्या तालुकास्तरीय १९ वर्षाखालील स्पर्धेत श्रीदत्त कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक मिळाला.नवभारत शिक्षण मंडळ सांगली ,संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड या शैक्षणिक संस्थेच्या क्रीडा क्षेत्रातील घौडदौडीत आणखी एक विजयाने भर पडली .श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाच्या कब्बडी संघाने शिरोळ या ठिकाणी झालेल्या तालुकास्तरीय कब्बडी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला. या विजयी संघाला महाविद्यालयाचे प्राचार्य मा.श्री .आर जे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयातील खेळाडू अतिशय सुंदर रीतीने क्रीडा क्षेत्रात वाटचाल करताना दिसत आहेत .अनेक क्रीडा स्पर्धांमध्ये श्रीदत्त कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंनी नाविन्यपूर्ण यश मिळविले आहे .श्रीदत्त कनिष्ठ महाविद्यालय परिसरातील मोठा नावलौकिक असलेले महाविद्यालय आहे .प्रशस्त क्रीडांगण असणाऱ्या या महाविद्यालयाच्या खेळाडूंना फायदा होताना दिसून आला .अत्यंत दमदार कामगिरी करत खेळाडूंनी प्रथम क्रमांकाला मजल मारली.या विजयी संघाला संस्थेचे संचालक मा .श्री. गौतम पाटील ,कार्याध्यक्ष मा. श्री .गणपत दादा पाटील, उपसंचालक श्री .बी .आर थोरात, उपसंचालक श्री.डी. एस माने ,शाखेचे कार्याध्यक्ष श्री. अण्णासाहेब माने गावडे ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री .रावसाहेब पाटील, सदस्य श्री. देवराज मगदूम, सदस्या श्रीमती विनया घोरपडे ,क्रीडाशिक्षक श्री .एस. एस गडदे ,महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.