जयसिंगपूर / प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे नव्या पिढीसाठी सदैव प्रेरणादायी राहिले आहेत. हाच विचार डोळ्यांसमोर ठेवून शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात भव्य भीमसृष्टी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे काम सुरू झाले आहे. तर कुरुंदवाड येथेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारणीचे काम वेगाने सुरू असून समाजातील सर्व घटकांसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी केले.ते कुरुंदवाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या स्लॅब पूजन व शुभारंभ प्रसंगी बोलत होते.या कामासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या निधीतून तब्बल ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.कार्यक्रमाच्या प्रारंभी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्तीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर पुतळ्याच्या स्लॅबचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.या वेळी बोलताना संजय पाटील यड्रावकर पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा म्हणजे विचारांचे स्त्रोत आहे. आजची युवा पिढी त्यांचे विचार आत्मसात करून बलशाली भारतासाठी सक्षम नागरिक म्हणून घडली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथालय, अभ्यासिका, तसेच यूपीएससी – एमपीएससी मार्गदर्शन केंद्र उभारण्याचाही संकल्प केला आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहीमी कायम पाठीशी उभे राहणार आहे.जयसिंगपूरमध्ये उभारण्यात येणारी भीमसृष्टी ही केवळ एक वास्तू न ठरता समाजाला मार्गदर्शन करणारे केंद्र ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कुरुंदवाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा उभारणीमुळे तेथील नागरिकांमध्येही मोठा उत्साह असून हा उपक्रम ऐतिहासिक ठरणार आहे. प्रारंभी कुरुंदवाड पुतळा समितीचे प्रमुख धम्मपाल ढाले यांनी स्वागत केले. यावेळी संजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते उपस्थित भीमसैनिकांना लाडूचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमस्थळी जय भीमच्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले होते.यावेळी मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई, रामचंद्र डांगे, डॉ. एस.के. माने, रमेश भुजुगडे, रामचंद्र मोहिते, अनुप मधाळे सुनिल कुरुंदवाडे, संजय शिंदे, शाहीर आवळे, अण्णाप्पा आवळे, जय कडाळे, सुरज शिंगे, धम्मपाल ढाले, संजय कांबळे, स्वप्निल गोरे राहुल कांबळे, कुणाल कांबळे, सुशांत ढाले, समीर ढाले, अमोल कांबळे, सुशांत गोरे, शुभम गोरे, सागर बिरणगे, हर्षवर्धन कांबळे, महादेव बागलकोटे, अश्विनी ढाले, कृष्णाताई मधाळे, अनुसया ढाले, जोशना ढाले, बाळकाबाई ढाले, अपेक्षा कडाळे, फारुख जमादार, किरण आलासे, उदय डांगे, अजित देसाई, अक्षय आलासे, ॲड. विजय जमदग्नी, दादासाहेब पाटील, जवाहर पाटील, बाळासाहेब दिवटे, शरद आलासे, अजित भोसले, महावीर पाटील, रवीकिरण गायकवाड, अर्षद बागवान, दिलीप बंडगर, सुनिल चव्हाण, योगेश पाटुकले यांच्यासह कुरुंदवाड शहर परिसरातील भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.