इचलकरंजी / प्रतिनिधी
अभियंता दिनाचे औचित्य साधून असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स & अर्किटेक्ट्स, इचलकरंजी आणि जे.के.सिमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने “सर्वश्रेष्ठ अभियंता पुरस्कार २०२५” सोहळा राधे बँक्वेट हॉल, इचलकरंजी येथे मोठ्या उत्साहात पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. असोसिएशनचे अध्यक्ष इंजि. राजेंद्र खंडेराजुरी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.या कार्यक्रमात जे.के.सिमेंटचे झोनल हेड मुकुंद देशपांडे, स्टेट हेड महेश बेंद्रे, टेक्निकल हेड उत्सव गौतम, ए.एस.एम.सागर तलवार, मार्केटिंग हेड दयानंद कलाल,तसेच वितरक सर्वेश सिमेंट शॉपीचे मालक पन्नालाल डाळ्या यांचा सन्मान करण्यात आला.जे.के.सिमेंटच्या वतीने असोसिएशनचे अध्यक्ष इंजि. खंडेराजुरी व सचिव आर्कि. विकास नाईक यांचा सत्कार करण्यात आला.महेश बेंद्रे यांनी कंपनीची माहिती दिली,तर टेक्निकल हेड उत्सव गौतम यांनी नव्या वॉटरप्रूफिंग प्रॉडक्ट्सची माहिती सादर केली.इंजि.मोहन पाटील यांना झोनल हेड मुकुंद देशपांडे यांच्या हस्ते, इंजि.अरविंद चव्हाण यांना स्टेट हेड महेश बेंद्रे यांच्या हस्ते,इंजि.अरिंजय पाटील यांना मार्केटिंग हेड दयानंद कलाल यांच्या हस्ते,इंजि.विवेक सावंत यांना ए.एस.एम. सागर तलवार यांच्या हस्ते या वर्षीचा सर्वश्रेष्ठ अभियंता पुरस्कार अभियंत्यांना प्रदान करण्यात आला.पुरस्कार सोहळ्याचे हे चौथे यशस्वी वर्ष असून यामागचा हेतू अभियंत्यांचे कार्य समाजासमोर आणणे,असा उद्देश वितरक श्री. पन्नालाल डाळ्या यांनी व्यक्त केला. कार्यक्रमात असोसिएशनचे खजिनदार नितीन शेट्टी, संचालक सचिन बोरा, विठ्ठल तोडकर, भारत केटकाळे, गिरीश माकाशी, सुहास रूगे, प्रकाश मालवीय, रवींद्र तोरस्कर, महेश महाजन, अक्षय मालपाणी, माजी अध्यक्ष व इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन इंजि. जीवन घाटगे व आर्कि. वीरेन लखमानी यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिव आर्कि.विकास नाईक यांनी केले.