जनता मेंटल नाही,तर सुज्ञ मोबिन मुल्ला यांचा गंभीर आरोप

Spread the love

उदगाव / प्रतिनिधी

 

उदगाव ग्रामपंचायत हद्दीत प्रादेशिक मनोरुग्णालय उभारण्यात येत असल्याचा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड युवा मंचचे प्रदेश संघटक मोबिन मुल्ला यांनी केला आहे.या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला.यावेळी मोबिन मुल्ला यांनी लोकप्रतिनिधीवर टीका केली आहे.शिरोळ तालुक्यातील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जनता मेंटल नाही,तर सुज्ञ आहे.कॅन्सरचे प्रमाण वाढत असून,येथे कॅन्सर रुग्णालयाची गरज असताना नेत्यांच्या हट्टापोटी मनोरुग्णालय उभारले जात आहे.यामागे जमिनी लाटण्याचा डाव आहे.सदर जागा ही 42 एकरांची असून,ती एका दानशूर व्यक्तीने आरोग्य विभागाला दान केली होती. मात्र,आज या जमिनीचा वापर आरोग्यासाठी न होता अन्य कारणांसाठी केला जात आहे. याठिकाणी ऐतिहासिक टीबी रुग्णालय होते,मात्र आता या जागेवर भ्रष्टाचार सुरू आहे.या ठिकाणी जैन मंदिर व बिरोबा मंदिर असून, त्याच्या शेजारी मनोरुग्णालय उभारणे ही धार्मिक भावना दुखावण्यासारखी बाब आहे. तत्कालीन आरोग्य राज्यमंत्र्यांनी आर्थिक स्वार्थापोटी सर्वांचा विरोध असूनही हा प्रकल्प पुढे रेटला असल्याचा आरोपही त्यांनी केला.ही लढाई माझी नसून संपूर्ण तालुक्याची आहे. ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन आणि नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन योग्य ती कारवाई करावी,” अशी मागणी करत अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण करण्याचा इशाराही मोबिन मुल्ला यांनी दिला.

Leave a Comment

error: Content is protected !!