पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
कोल्हापूर सांगली राज्य महामार्गावर ट्रकने दुचाकीस धडक दिल्याने तरूण जागीच ठार झाला हा अपघात आज गुरूवारी रात्री ९ वाजण्यासुमारास पुलाची शिरोली येथील मार्बल मार्केट येथील गोल्डन मार्बल दुकानासमोर झाला . मयत तरूणाचे नाव प्रणव रावसो पाटील ( वय 25 रा माणगाववाडी ता हातकणंगले ) अधिक माहिती अशी की प्रणव पाटील हा कोल्हापूर येथील खासगी मेडीकल शाॅपमध्ये फार्मा सिस्ट म्हणून काम करत होता तो आज आपली ड्युटी संपवून आपल्या मोटरसायकलवरून गावी माणगाववाडी घरी जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. प्रणवच्या लहान वयातच त्याच्या वडीलांचे निधन झाल्याने त्याच्या आईने त्याला लहानाचे मोठे करत त्याच्यावर चांगले संस्कारासह शिक्षण देवून फार्मसी कोर्स चे शिक्षण पुर्ण करून तो कोल्हापूर येथील मेडिकलमध्ये काम करत होता आईने आपल्यासाठी केले कष्ट त्याने जवळून पाहील्याने तो मेडिकलमध्ये काम करून आईला सुखात ठेवण्याचा प्रयत्न करत होता पण त्याचे प्रयत्न नियतीला मान्य नसावे.त्याच्या अशा अपघाती निधनाने त्याच्या आईवर दुःखाचा डोंगर कोसळला .या अपघाताची माहिती माणगाववाडी वाऱ्यासारखी पसरल्याने गावावर शोककळा पसरली… .