पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे
शासनाच्या लोकाभिमूख ध्येयातून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर राबवले जात असून या शिबिरातून लाभार्थ्यांना थेट विविध योजनांचा लाभ मिळवून देणे ही या शिबिरामागची प्रमुख भूमिका असल्याने नागरिकांना योजनांच्या मुख्य प्रवाहात आणणे हाच शासनाचा उद्देश असल्याचे टोप चे सरपंच तानाजी पाटील यांनी टोप येथे बोलताना व्यक्त केले या शिबिराच्या अध्यक्षस्थानी ते होते. यावेळी शिरोली मंडळ अधिकारी सीमा मोरेये प्रमुख उपस्थित होत्या.यावेळी प्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवराय व राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिबीरास सुरूवात करण्यात आली .हे शिबीर शिरोली मंडल परिसरातील टोप, संभापूर, कासारवाडी, नागाव, हालोंडी, शिरोली या गावातील नागरिकांसाठी एकत्र शिबिर आयोजित केले कारण या शिबिराच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ वंचितांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात असून ज्यांना लाभ मिळाला नाही, त्यानी आपल्या कागदपत्रांची पूर्तता करून कागदोपत्री जे अडथळे निर्माण होतील ते निश्चीत दूर करून त्याना दाखले देण्यात येईल असे मंडल अधिकारी सीमा मोरेये म्हणाल्या. यावेळी विविध दाखल्यांचे वाटप नागरिकांना करण्यात आले .यावेळी डॉ.प्रदीप पाटील, ग्रामविकास अधिकारी टी के मडवळ, गाव कामगार तलाठी अमोल कोटे, नागावच्या श्रध्दा अंबपकर, महेश सूर्यवंशी, नागेश तोंडरोड, सिकंदर पेंढारी, दिलीप मुळीक, सुनील काटकर, विश्वास करणे, दीपक पाटील, मानसिंग गायकवाड, बाळासो कोळी व वरील सर्व गावातील महा ई सेवा केंद्र चालक व गावातील अंगणवाडी सेविकांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.