पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
नागांव व शिरोली पुलाची ता हातकणंगले येथे चोरून मटका घेणाऱ्या दोघासह मटका मालकावर गुन्हा दाखल हि कारवाई कोल्हापूर येथील गुन्हे अन्वेषण व शिरोली पोलिसानी केली असून यामध्ये ३१ हजाराचा मुददेमाल जप्त केला . हि कारवाई सोमवार व मंगळवारी करण्यात आली . शिरोली पोलिसांचे या अवैद्य मटका मालक चालक यांच्याशी जवळीक असल्याने याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांशी देणे टाळत असतात .नागांव फाटा येथील मातोश्री पान शाॅप समोर उघड्यावर मटका घेणाऱ्या केतन अशोक चव्हाण व मटका मालक निखिल भाऊसो नागावकर याच्यावर कारवाई करण्यात आली यांच्याकडून रोख ५२० रूपये व २० हजार किमतीचा सॅमसंग मोबाईल व सिम कार्ड जप्त केले तर शिरोली कोल्हापूर अॅक्सलच्या मागील बाजूस असणाऱ्या माऊली वजन काट्याजवळ चोरून कल्याण मटका घेणाऱ्या रमिझ शफी देसाई ( वय ३२ रा माळवाडी शिरोली ) याला ताब्यात घेवून त्यांच्याकडून ११ हजाराचा मुददेमाल जप्त केला हि कारवाई शिरोली पोलिसांनी आज मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्यासुमार केली असून दोन्ही गुन्हयातील एकूण ३१५२० रूपयाचा मुददेमाल जप्त केला .कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक डाॅ. योगेशकुमार गुप्ता यानी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यानी जिल्ह्यातील अनेक अवैद्य व्यवसायामुळे भरकटलेली कायदाव्यवस्था सुस्थितीत आणण्यासाठी अवैद्य व्यवसायाला चाप लावून अवैद्य व्यवसायाची पाळेमुळे नष्ट करण्याचा पवित्रा हाती घेतल्यानंतर हि शिरोली पोलिस ठाण्याच्या आवारात अनेक अवैद्य व्यवसाय सुरू असून देखील याकडे शिरोली पोलिस दुर्लक्ष करीत असल्याचे या कारवाईतून दिसून येते .