अहिल्या भवन धनगर समाज सांस्कृतिक हॉल हॉलसाठी ४० लाख दिलेत आणखी ५० लाख देणार – मा. मंत्री प्रकाश आवाडे

Spread the love

हातकणंगले / प्रतिनिधी 

 

माजी मंत्री प्रकाश आवाडे व आमदार राहुल आवाडे यांच्या फंडातून मंजूर झालेल्या धनगर समाज सांस्कृतिक हॉल (अहिल्या भवन) च्या बांधकामातील दुसऱ्या टप्प्यातील स्लॅब पूजनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.हा सोहळा देबाजे मामा हेरवाडकर यांच्या उपस्थितीत पार पडला.या हॉलच्या पहिल्या मजल्यासाठी नगरपंचायतीचे मा. बांधकाम सभापती अभी लुगडे यांनी मा.आम. आवाडे यांच्या फंडातून ४० लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला होता. आजच्या पूजन प्रसंगी उपस्थितांनी इमारतीला आणखी एक मजला द्यावा, अशी मागणी केली. त्यावर प्रतिसाद देताना माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी, “लवकरच आणखी ५० लाखांचा निधी उपलब्ध करून देणार”, असे आश्वासन दिले.या वेळी बोलताना माजी मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले ,धनगर समाजाने लोकवर्गणीतून ही जागा विकत घेतली होती. समाजाच्या मालकीच्या जागेवर सांस्कृतिक हॉल व्हावा, अशी मागणी आली होती. आम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा करून निधी मंजूर करून आणला. समाजासाठी निधी देण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे. मी करतो म्हणून हे झाले नाही, तर नियतीप्रमाणे जे घडायचे ते घडते. त्यात आम्हाला निधी लावण्याची संधी मिळाली, याचा मोठा आनंद आहे.हातकणंगले नगरीत आतापर्यंत साडेसहा कोटी रुपयांचा निधी मा. मंत्री प्रकाश आवाडे व आमदार राहुल आवाडे यांच्या फंडातून उपलब्ध करून दिला गेला आहे. यापैकी जवळपास एक कोटी निधी हा धनगर समाज सांस्कृतिक हॉलसाठी दिला गेला असून, त्यामुळे समाजबांधवांनी पुष्पगुच्छ देऊन मंत्री आवाडे यांचे मन:पूर्वक स्वागत केले.या पूजन सोहळ्याला बापूसाहेब ठोंबरे, रावसाहेब कारंडे, युवराज ठोंबरे, आबा ठोंबरे, दीपक ठोंबरे, पांडुरंग ठोंबरे, अतुल मंडपे, विजय निंबाळकर, संभाजी आरगे, शिवाजी आरगे, संतोष धनगर, लक्ष्मण धनगर, आनंदा आरगे, बाळासाहेब धनगर, सुरेश ठोंबरे, दशरथ धनगर, विलास धनगर, डॉ. सुकमार देवकाते यांच्यासह मान्यवर, नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी नगराध्यस पदांचाठी अभिजित लुगडे यांचे नाव चर्चेत आहे यावर आपले मत काय अशी विचारणा आवाडे यांच्याकडे केली असता आपल्यांकडे अनेकांनी मागणी केली आहे मात्र पक्षस्तरांवर याचा निश्चित विचार केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment

error: Content is protected !!