हातकणंगले / प्रतिनीधी
भारतमातेला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी इंग्रजांच्या विरोधात लढणाऱ्यांच्या मांदीयाळीमध्ये देशभक्त रत्नापण्णांचे नांव आग्रक्रमाने घेतले जाते . स्वातंत्र्य चळवळीसाठी त्यांनी दाखविलेला त्याग , पाच वर्ष भूमिगत राहुन घेतलेले कष्ट पश्चिम महाराष्ट्रातील छोठ्या मोठया गावांतून तेव्हाच्या तरूण पीडीला दिलेली प्रेरणा आणि त्यातून घडलेले क्रांती कार्य या सर्वच गोष्टी वंदनीय आहेत . आशा देशभक्त रत्नापण्णा कुंभार यांच्या ११६ व्या जयंती निमीत्त विवीध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .सोमवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी देशभक्त रत्नापण्णा कुंभार यांच्या स्मृती प्रित्यर्थ कोरोचीतील धनगर माळापासुन संविधान गौरव जागर यात्रेचे आयोजन करण्यात आले असून सकाळी साडे नऊ वाजता पंचगंगा काखानास्थळी अभिवादन करण्यात येणार आहे . त्यानंतर रत्नदिप हायस्कूल येथे वकृत्व स्पर्धा होणार असुन दुपारच्या सत्रात विवीध वजनी गटातील मॅटवरील कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पंधरा वर्षाखालील , सिनीअर गट , ओपन गट ७० ते ८० किलो आशा गटात कुस्ती स्पर्धा होणार असून वरील सर्व कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी पंचगंगा कारखान्याच्या माजी अध्यक्षा सौ रजनिताई मगदूम या असणार असून कार्यक्रमासाठी विवीध मान्यवर उपस्तीत राहणार असल्याची माहिती देशभक्त रत्नापन्ना कुंभार जयंती उस्तव समितीने प्रसीद्धी पत्रकाद्वारे दिले आहे.