एकीकडे तोंड गोड तर दुसरीकडे कोळी कुटुंबियावरील हल्ल्याची चौकशी सुद्धा नाही
शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील कनवाड येथे अक्षय कोळी व त्यांच्या कुटुंबीयांवर विधर्मी व्यक्तीकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला.या हल्ल्यात त्यांच्या घराची तोडफोड करण्यात आली असून, संपूर्ण कुटुंब भयभीत झाले आहे.या प्रकरणात पीडित अक्षय कोळी व त्यांच्या कुटुंबावर अन्याय झाल्याची भावना असून, त्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी गुरुवारी सकल हिंदू समाजाच्या वतीने शिरोळ येथून मोर्चा काढण्यात आला.
हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू होऊन शिरोळ तहसील कार्यालयावर धडकला.मोर्चात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला होता. या वेळी कनवाड येथे घडलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला.मोर्चाच्या माध्यमातून प्रशासन आणि सरकार यांच्यावर दबाव टाकण्यात आला की,दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि कोळी कुटुंबाला संरक्षण व न्याय मिळावा.
या मोर्चाचे विशेष म्हणजे ३३९ किलोमीटर अंतरावरून खास शिरोळसाठी उपस्थित राहिलेले अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप आणि ह.भ.प.संग्राम भंडारे. या दोघांनीही कोळी कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत, संपूर्ण हिंदू समाज त्यांच्या सोबत असल्याचा विश्वास दिला.
दुसरीकडे, शिरोळ तालुक्याचे आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर,आमदार अशोकराव माने,माजी खासदार राजू शेट्टी,माजी आमदार उल्हास पाटील आणि माजी जि.प.सदस्य अनिल ऊर्फ सावकर मादनाईक या स्थानिक नेत्यांनी कोळी कुटुंबावर झालेल्या हल्ल्याचा निषेधार्थ मोर्चामध्ये सहभागी व्हायला हवे होते मात्र या लोकप्रतिनिधींनी अद्याप कोळी कुटुंबियांची साधी चौकशीही केली नसल्याने मोर्चेकऱ्यांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.“या लोकप्रतिनिधींना कनवाडमध्ये जाण्यास भीती का वाटते?”असा सवाल संतप्त हिंदू समाजाकडून उपस्थित केला जात आहे.या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करत,कोळी कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असा इशारा मोर्चाच्या नेतृत्वाने दिला असला तरी भविष्यात येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच लोकप्रतिनिधी या मोर्चाकडे पाठ फिरवली असल्याचेही यावेळी बोलण्यात येत होते.
चौकट
अक्षय कोळी यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर झालेला हल्ला हिंदू समाज कधीही सहन करणार नाही.या अत्याचाराला उत्तर नक्कीच दिले जाईल. ज्या पद्धतीने अत्याचार होतील त्याच पद्धतीने हिंदू समाज इथून पुढे सडेतोड उत्तर देईल
आमदार आमदार संग्राम जगताप
चौकट
इस्लामी सत्ता निर्मितीसाठी विधर्मीकडून हिंदूंवर जाणीवपूर्वक अत्याचार करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. आपले रक्षण करण्यासाठी हिंदू समाज एकवटला पाहिजे. त्यासाठी हिंदुत्वाची संघटनांनी प्रत्येक गावात गल्ली-बोळात जाऊन जनजागृती केली पाहिजे.येणाऱ्या काळात हिंदूंवर झालेल्या अत्याचार खपवून घेतले जाणार नाही.ही दाखवण्याची वेळ आली आहे.
ह.भ.प संग्राम भंडारे