पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करून दोन बांगलादेशी तरुणींची सुटका केली.ही कारवाई दहशतवादविरोधी पथक आणि शिरोली पोलिस यांनी संयुक्तपणे करत दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून मोबाईल फोन , रोख रक्कम , व इलेक्ट्रीक मोपेड व चार चाकी कार असे २ लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आरोपी कल्लेश चंद्रकांत खेकरे (वय २५, लोहार गल्ली, शिरोली) व बाबू बाळू पवार, वय २०, रा. वारणा कोडोली) याना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली .
पोलिसातून मिळालेली अदिक माहिती अशी कि शिरोली पुलाची ता हातकणंगले येथील यादववाडी परिसरात गणेश मंदिराजवळील सिध्दीविनायक अपार्टमेंटमध्ये दोन बांगलादेशीय महिलांकडून अवैध वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर येथे छापा टाकून पोलिसानी दोन पिडीत महिलाना ताब्यात घेवून त्यांच्याकडे अदिक चौकशी केली असता त्यानी कल्लेश खेकरे व बाबू पवार यानी त्याना वेश्यागमनासाठी व ग्राहकांना पुरविणेसाठी या अपार्टमेंट मध्ये रुम भाडयाने घेऊन त्यांना वास्तव्यास ठेवले असल्याची माहिती समोर आली यावेळी पीडित महिलांसह आरोपी यांच्याकडून मोबाईल फोन , रोख रक्कम , व इलेक्ट्रीक मोपेड व चार चाकी कार असे २ लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे .