कुंभोज / प्रतिनिधी
कुंभोज येथे कुंटणखान्यावर छापा टाकल्याच्या बातमीमुळे संपूर्ण गावात संतापाची लाट उसळली आहे.प्रत्यक्षात सदर घटनेचा कुंभोज गावाच्या हद्दीशी काहीही संबंध नसतानाही गावाचे नाव आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर गावाची बदनामी होत असून,या विरोधात आज ग्रामपंचायतीच्या वतीने हातकणंगले पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आले.यावेळी कुंभोजचे उपसरपंच आप्पासाहेब पाटील,छत्रपती राजाराम कारखान्याचे संचालक अमित साजनकर, पत्रकार विनोद शिंगे,सचिन भानुसे,सचिन लोंढे, शकील सुतार,वसंत कांदेकर,यौवन घाटगे, सागर सुवासे, सुरेश भगत,विनायक पोद्दार, विश्वजीत माने यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी यावेळी स्पष्ट केले की,सदर कारवाई रात्री उशिरा झाल्याने दिलेली माहिती घटनास्थळी तातडीने मिळालेल्या माहितीनुसार देण्यात आली. त्यामुळे गावाचे नाव चुकून दिल्याचे त्यांनी मान्य केले.तसेच,कुंभोजमध्ये कोणत्याही प्रकारचा कुंटणखाना चालत नसल्याचा खुलासाही त्यांनी केला.या प्रकरणामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप असून,चुकीच्या बातम्या प्रसिद्ध करणे थांबवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.