कुरुंदवाडच्या पाणी उपोषणाला सर्वतोपरी पाठिंबा राहील – पृथ्वीराज यादव

Spread the love

कुरुंदवाड / प्रतिनिधी

कुरुंदवाड शहराची नळ पाणीपुरवठा योजना ही ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे आणि नाकर्तेपणामुळे रखडली असून, ही योजना पुन्हा मार्गी लागावी यासाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत नव्याने प्रशासकीय मान्यता मिळवणे अत्यावश्यक आहे.या मागणीसाठी सुरू असलेल्या सर्वपक्षीय कृती समितीच्या आंदोलनाला आमचा ठाम पाठिंबा असून, यासाठी तीव्र लढा उभारण्यात येईल, असे आश्वासन शिरोळचे माजी उपसरपंच पृथ्वीराज यादव यांनी दिले. 

 

 

कुरुंदवाड शहरात सुरू असलेल्या 94 दिवसांच्या उपोषण आंदोलनाला भेट देताना यादव बोलत होते. त्यांनी आंदोलनकर्त्यांच्या धैर्याचे कौतुक करत या लढ्याची गरज अधोरेखित केली.यावेळी माजी नगरसेवक आवळे म्हणाले आंदोलनाबाबत माजी मंत्री सतेज पाटील यांनी विधान परिषदेत लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता. याचे उत्तर आल्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याचे सांगितले,आम आदमी पार्टीचे आदम मुजावर यांनीही आंदोलन स्थळी भेट देऊन पाण्याच्या प्रशासकीय मान्यतेसाठी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा लोकआंदोलन अधिक तीव्र होईल, असा इशारा मुजावर यांनी देत या आंदोलनात सर्वपक्षीय एकजूट हीच या लढ्याची ताकद असल्याचे मत व्यक्त केला.यावेळी प्रफुल पाटील, तानाजी आलासे, जितेंद्र साळुंखे, सुरेश हलवाई, आण्णासाहेब जामदार, इकबाल बागवान, धोंडीबा वाघ, सलीम मणेर,रियाज शेख, अर्षद बागवानसह आदी सर्वपक्षीय कृती समितीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी उपस्थित होते.

error: Content is protected !!