नागाव फाटा नजीक टँकर खाली सापडून तासगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू!

Spread the love

पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे

 

पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नागाव फाटा नजीक दि कोल्हापूर स्टील सांस्कृतिक हॉल समोर दुधाच्या टँकर खाली सापडून तासगाव च्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कौशिक दिलीप सासणे( वय-२५) रा.तासगाव, जि.सांगली हा युवक एम एच १० डी एफ ०२२१ या क्रमांकाच्या मोटरसायकल वरून बापूसो रामचंद्र गावडे वय (५५) मोटारसायकल वरून दोघे मित्र अमावस्या असल्याने आदमापूर येथील श्री बाळूमामाच्या दर्शनासाठी सकाळी आले होते. त्याठिकाणी दर्शन घेतल्यानंतर तेथे त्यांच्या भागातील एक व्यक्ती गाठ पडली,त्याला कौशिक ने आपल्या मोटरसायकल वर बसविले. तेथून परत तासगाव कडे येत असताना त्यांची गाडी नागाव फाटा नजीक आली असता समोर असणाऱ्या चार चाकी गाडीने अचानक ब्रेक मारल्याने मोटारसायकल कार ला धडकून गाडी सह कौशिक व त्याचा सहकारी बापू सो रामचंद्र गावडे रस्त्यावर पडले.तितक्यात त्यांच्या मागून कोल्हापूर जिल्हा दूध संघाचा एम एच ०९ एफ एल १८१९ या क्रमांकाचा टँकर आला असता ,अचानक समोर मोटारसायकल पडल्याने टँकर चालकाच्या बाजूची चाके कौशिक च्या अंगावरुन गेली असता कौशिक दिलीप सासणे हा युवक जागीच ठार झाला. तर त्याचा साथीदार थोडक्यात बचावला.अपघातानंतर कार चालकाने गाडीसह पळ काढला. अपघाताची माहीती समजताच शिरोली एमआयडीसी पोलीस घटनास्थळी पोहोचले. पंचनाम होवून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कोल्हापूर येथील शासकीय इस्पितळात पाठविण्यात आला. जखमी बापूसो रामचंद्र गावडे यालाही पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे .या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे.

error: Content is protected !!