हातकणंगलेच्या पोपटराव वाकसे यांची कोजिमाशि संचालकपदी निवड

Spread the love

हातकणंगले / प्रतिनिधी

 

हातकणंगले येथील श्री रामराव इंगवले हायस्कूलमध्ये इंग्रजी विषयाचे शिक्षक आणि पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेले पोपटराव वाकसे यांची कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित (कोजिमाशि) कोल्हापूरच्या इचलकरंजी शाखेच्या संचालकपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात सातत्यपूर्ण कार्य करत असलेल्या श्री. वाकसे यांच्या कार्याची दखल घेऊन ही महत्त्वाची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल स्वाभिमानी आघाडीचे सर्वेसर्वा दादासाहेब लाड, कोजिमाशि इचलकरंजी शाखेचे चेअरमन श्री. जितेंद्र म्हैशाळे,संचालक श्रीकांत कदम, संचालक डॉ.दत्तात्रय घुगरे आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.श्री. वाकसे हे गेली दोन दशके शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी घेतलेली मेहनत आणि सामाजिक कार्यातील त्यांचा सक्रिय सहभाग नेहमीच कौतुकास पात्र ठरला आहे.त्यांनी हातकणंगले तालुक्यातील अनेक उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग घेतला असून शिक्षक संघटना,शाळा व्यवस्थापन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयातून शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी काम केले आहे.त्यांच्या निवडीमुळे हातकणंगले परिसरात आनंदाचे वातावरण आहे.विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी,सहकारी शिक्षक,माजी विद्यार्थी व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.कोजिमाशि ही शिक्षण सेवकांसाठी कार्य करणारी महत्त्वाची पतसंस्था असून संस्थेच्या इचलकरंजी शाखेतून अनेक उपयुक्त उपक्रम राबवले जातात.श्री.वाकसे यांच्या संचालकपदाची निवड ही संस्थेच्या प्रगतीसाठी निश्चितच फलदायी ठरेल,असा विश्वास शिक्षण व सहकारी क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!