केंद्र पुरस्कृत निवृत्ती वेतन योजनांच्या लाभार्थ्यांसाठी जीवन प्रमाणपत्र अनिवार्य

Spread the love

हातकणंगले / प्रतिनिधी 

केंद्र शासनाच्या विविध पुरस्कृत योजनांतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांना जीवन प्रमाणपत्र (डीएलसी) सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनांचा समावेश असून, डीएलसी प्रणालीद्वारे Beneficiary Salyapan App’ वापरून नोंदणी करणे आवश्यक आहे. दिनांक 14 जुलै 2025 रोजी केंद्र शासनाच्या वरिष्ठ अधिका-यांनी दिलेल्या निर्देशानुसार, माहे जुलै 2025 अखेरपर्यंत सर्व केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी लाभाथ्यर्थ्यांचे जीवन प्रमाणपत्र जनरेट करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेशिवाय लाभार्थ्यांना पुढील लाभ मिळणार नाही, तसेच एनएसआय पोर्टलवर हयात नसलेल्या लाभार्थ्यांचे वर्गीकरण करून त्यांची नोंद वगळण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

 

महाराष्ट्र राज्यात लाभाथ्यर्थ्यांची संख्या जास्त असल्याने, अनेक ठिकाणी ओव्हर डिजिटायझेशन झाले आहे. त्यामुळे हयात नसलेले लाभार्थी पोर्टलवरून वगळल्याशिवाय नवीन लाभार्थ्यांची नोंदणी करता येणार नाही. यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण व जीवन प्रमाणपत्र जनरेट करणे आवश्यक आहे. Beneficiary Sattyapan App द्वारे जीवन प्रमाणपत्राची नोंदणी करण्यासाठी आपले जवळच्या महा ई सेवा केंद्रामध्ये तसेच तलाठी कार्यालयातील कोतवाल यांचेशी संपर्क साधून लाभार्थ्यांनी आधार कार्ड दूरध्वनी क्रमांकासह उपस्थित राहून आपले बीएसए क्रमांक अदयावत करुन घेणे अनिवार्य आहे. या प्रक्रियेची पूर्तता झाल्याशिवाय लाभार्थी ग्राह्य धरले जाणार नाहीत. त्यामुळे सर्व लाभाथ्यांनी तातडीने नोंदणी करून लाभाची सातत्याने प्राप्ती सुनिश्चित करावी. असे आवाहान हातकणंगले तहसिलदार सुशील बल्हेकर यांनी केले आहे

error: Content is protected !!