घुणकी येथे भीषण अपघात: बोलेरोची धडक, एका महिलेचा मृत्यू, एक जखमी
पुलाची शिरोली / कुबेर हंकारे
हातकणंगले तालुक्यातील घुणकी गावच्या हद्दीत किणी टोल नाक्याजवळ पुणे-कोल्हापूर महामार्गावर 11 जुलै रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास बोलेरो पिकअप आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून एक पुरुष गंभीर जखमी झाला आहे.या प्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी स्वप्नील विठ्ठल पाटील (वय 35, रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सिदाप्पा तिप्पन्ना माळगे (रा. इरलाट्टी थोट, ता. गोकाक, जि. बेळगाव, कर्नाटक) याने बोलेरो पिकअप (क्र. KA-22-D-6762) भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवताना, दुचाकी (क्र. MH-09-GW-5376) यास पाठीमागून जोरदार धडक दिली.या धडकेत दुचाकीवरील चालक मोहन सदाशिव पाटील (वय 55) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पाठीमागे बसलेल्या पत्नी स्वाती मोहन पाटील (वय 50) यांचा जागीच मृत्यू झाला.या प्रकरणी वडगाव पोलिसांनी IPC कलम 106(1), 281, 125(a)(b) व मोटार वाहन कायदा कलम 184 अंतर्गत गुन्हा क्रमांक 399/2025 नोंदविला आहे. तपास पोलीस नाईक खैरमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार कराड करत आहेत.”