शिरोळ / प्रतिनिधी
सन १९९९ पासून सन २०२५ अखेर अखंड २६ वर्षे धर्मपुरी (जि. सोलापूर) येथे शिरोळच्या काळे परिवाराच्या वतीने वारकऱ्यांसाठी एक दिवसाचा प्रसाद वाटप केला जातो.माजी नगरसेवक पंडित काळे यांचे वडील वैकुठवासी ह. भ. प. नारायण उर्फ शामराव काळे (नाना) यांनी आषाढी एकादशी निमित्त होणाऱ्या आळंदी ते पंढरपूर अखंड ३८ वर्षे पायी दिंडी केली आणि परती वारी पंढरपूर ते आळंदी ९ वेळा पायी वारी केली. सन १९९९ साली आपल्या सोबत असणाऱ्या वारकऱ्यांना एक दिवस भोजन देण्याचे निर्णय घेतला. प्रथमता केवळ ६० वारकरी यांना प्रसाद देऊन सुरुवात केली. आज जवळ जवळ १५००ते१६००वारकरी प्रसादाचा लाभ घेतात.प्रसादासाठी आजरेकर फंडाचे मुख्य माऊली हे भ प बोराडे माऊली व आळंदी ते पंढरपूर दिंडीचे मुख्य चोपदार ह. भ. प. बाळासाहेब चोपदार हे ही प्रसादासाठी आवर्जून उपस्थित असतात.माजी नगरसेवक पंडित काळे हे शिरोळहून प्रसादाचे आगोदर एक दिवस बरड (जि. सातारा) येथे मुक्काम करून पहाटे चालत जाऊन धर्मपुरी (जि. सोलापूर) येथे माऊलींचा दुपारच्या विसावा वेळी इरिगेशनच्या विश्रामगृहाच्या पटांगणात प्रसादाचे आयोजन केले जाते.दुपारी 12 वा.पालखी येते व वारकरी आले की फंडाच्या माऊली व चोपदार यांनी पाणी सोडल्यानंतर प्रसाद चालू होतो.एकावेळी प्रसाद घेणेसाठी ८०० ते ९०० वारकरी प्रसाद घेतात. गेली २५ वर्षे पंडित काळे यांनी त्यांचे वडील नारायण उर्फ शामराव (नाना) यांचे वतीने प्रसाद दिला.नानाचे पश्चात यावर्षी पासून त्यांचे थोरले बंधू ह. भ. प. बाळासाहेब काळे (आण्णा) यांच्या मार्फत प्रसाद चालू केला आहे.हे करण्यासाठी त्यांचे बंधू बाळासाहेब, पुतण्या सचिन,सर्व भाचे, रोहित पाटील, गावातील सर्व वारकरी, मित्र धनाजी पाटील नरदेकर,प्रकाश माळी, बाळासाहेब कोळी, बापुसाहेब गंगधर ,बाबासो कोळी, रमेश चुडमुंगे,विजय काळे, महेश काळे,आनंदा बेडगे,संपत गावडे, श्रीकांत गंगधर,अजित कदम, राकेश कोळी,बबर जाधव असे जवळजवळ ५० जणांचा मित्रपरिवार नातेवाईक बरोबर असतात.श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक दरगु गावडे यांनी गेली १० ते १५ वर्षे आयशर टेम्पो भाडे न घेता फक्त तेल टाकून देतात.प्रशांत माने आगर हे कायम प्रसादासाठी लागणारी भांडी देतात गेल्या २६ वर्षात कोणाकडून ही आर्थिक मदत न घेता स्वतःच सर्व खर्च करतो तो आनंद वेगळाच आहे.हे सर्व माझे वडील नाना यांचे आशिर्वादमुळे चालू आहे.आज अखेर २६ वर्षात कोणताही अडथळा न येता अखंड सेवा सुरू आहे. असे पंडित काळे यांनी सांगितले.