पुलाची शिरोली येथे प्रकाश गणपती कौंदाडे यांच्या घोल शेतात (सनद माळशेजारी) सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सदर उपक्रम कार्यक्रमास समन्वयक अधिकारी अतुल आकुर्डे मुख्य लेखाधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर , सरपंच सौ पद्मजा करपे , सौ कमल कौदाडे ग्रा.स.सदस्या,उपसरपंच विजय जाधव , श्री राजेश पाटील चेअरमन पांडुरंग पाणीपुरवठा,व सर्व ग्रा.पं.सदस्य , सदस्या , प्रतिनिधी सौ कोळी ग्रामविकास अधिकारी, नागेश तोंदरोड ग्राम महसूल अधिकारी , संदीप पुजारी ,महसूल सेवक ,राजू खटाळे कृषी मित्र तसेच गावातील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. जीवामृत व विद्राव्य खते वेंचुरी द्वारे ठिबक मधून सोडणे प्रात्यक्षिक दाखवले, शिवार फेरी, पाचट व्यवस्थापन, कृषी विषयक विविध योजनांची माहिती, हेक्टरी 125 मे टन, दुध संस्था पाणीपुरवठा संस्था, तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी ठिकाणी माहिती व शेतकऱ्यांच्या अडचणी ऐकून घेणे. मार्गदर्शन इत्यादी विषयनिहाय या उपक्रमामध्ये बाबी राबविण्यात आल्या.