पुलाची शिरोली येथील ट्विंकल स्टार इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित दिंडी 

Spread the love

पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे

 

फुलाची शिरोली येथील ट्विंकल स्टार आषाढी एकादशी निमित्त इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये यावेळी वारकरी सांप्रदायिक महोत्सवाचे आणि दिंडीचे महत्त्व विशद केले यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल,रुक्मिणी संतांच्या आकर्षक वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. बालगोपालांनी वारकरी ड्रेस कपाळी गंध मुलींनी नऊवारी साडी नेसून डोक्यावर तुळशी गळ्यात टाळ, विणा ,मृदंग यांच्या नादाने सर्व परीसर भक्तीमय झाला होता चिमुकल्यांनी विठ्ठल नामाचा जप करीत अभंग, भावगीत, हरीपाठ सादर केला. विठ्ठल रखुमाई मुर्तीपुजन संस्थेचे चेअरमन संतोष बाटे आणि प्रिन्सिपल मनिषा बाटे यांनी केले. मुलांनी लेझीम आणि टाळ यांच्या तालावर नृत्य सादर केले. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा भाग असणारी आषाढी एकादशी सोहळा यंदा जल्लोषात व भक्तिमय वातावरणात साजरा केला. या वारीमध्ये भेदभाव दूर करण्यासाठी सर्व मुले सहभागी झाले होते. पायी दिंडीतून जनजागृतीद्वारे विद्यार्थी मनावर सांप्रदायिक बाबी प्रतिबिंबित करण्याचे कार्य दिंडी सोहळ्यातून ट्विंकल स्टार शाळेने राबविले. यावेळी चेअरमन संतोष बाटे प्रिन्सिपल मनिषा बाटे व्हाईस प्रिन्सिपल प्रतिक्षा पाटील पुनम बागी, दिक्षा लोहार, सारिका काळे, कविता कश्यप, संदिप पोवार, विजया पोवार रुचिता रावल, उमा सनदे. इ उपस्थित होते.

error: Content is protected !!