शिरोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) विधानसभा अध्यक्षपदी विशाल जाधव यांची नियुक्ती

Spread the love

कोल्हापूर / प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाच्या शिरोळ तालुका विधानसभा अध्यक्षपदी विशाल खंडेराव जाधव (रा. उदगाव) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या निवडीचे पत्र आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते कोल्हापुरात प्रदान करण्यात आले.यावेळी जयसिंगपूर शहराध्यक्षपदी चंद्रकांत धनाजीराव जाधव (घुणकीकर), शिरोळ शहराध्यक्षपदी संदीप शहाजीराव मोरे, कुरुंदवाड शहराध्यक्षपदी प्रकाश आलासे,शिरोळ तालुका सरचिटणीसपदी प्रशांत कदम (चिंचवाड) व तेजप्रताप माने (सैनिक टाकळी), मौजे आगर शहराध्यक्षपदी नितीन चव्हाण, चिंचवाड शहराध्यक्षपदी ऋषिकेश पाटील, तमदलगे शहराध्यक्षपदी शुभम पाटील तर नृसिंहवाडी शहराध्यक्षपदी राकेश खिरुगडे यांचीही नियुक्ती करण्यात आली.या निवडीनंतर बोलताना आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले की, “शरद पवार साहेबांनी स्थापन केलेल्या पक्षाचे मूळ नाव आणि चिन्ह टिकवण्यासाठी आम्ही न्यायालयात लढा देत आहोत. सध्या भारतीय निवडणूक आयोगाने ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ हे नाव व ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह दिले आहे. हे नविन नाव व चिन्ह जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम सर्व पदाधिकाऱ्यांनी तातडीने हाती घ्यावे.”या कार्यक्रमास माजी आमदार व माजी पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, राजे समरजीतसिंह घाटगे,आर.के.पोवार,राजीव आवळे, रामराजे कुपेकर,रावसाहेब भिलवडे, अनिल घाटगे,राजगोंड पाटील, विक्रमसिंह जगदाळे, अश्विनीताई माने, सौ. स्नेहा देसाई, डी. पी. कदम सर, दिनेश कांबळे, संदीप मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.विशाल जाधव यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडताना पक्षाची ध्येयधोरणे सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.

error: Content is protected !!