पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे
शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आज सर्व पक्षीय संघटनेच्या वतीने पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली इथल्या पंचगंगा नदी पुलाजवळ सुमारे दोन तास महामार्ग रोखून धरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी पांडुरंग सुबुद्धी देवो यासाठी 5 जुलै रोजी पंढरपुरात जावून पांडुरंगाला साखडं घेण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.यावेळी राजू शेट्टीसह माजी आमदार ऋतुराज पाटील,विजय देवणे याच्यासह अनेकाना पोलिसानी ताब्यात घेवून सोडण्यात आले.या पंचगंगा नदीत जलसमाधी धावलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्यातील 12 जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाचा प्रस्ताव आणला आहे या महामार्गाला सर्वच जिल्ह्यातून बाधीत शेतकऱ्यांचा विरोध होत असून सत्तेतील काही मंत्री,आमदार,खासदार यांनीही विरोध दर्शवीला आहे.कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या काही महामार्ग व पुलांच्या मुळे अनेक गावांना पुराचा धोका जाणवतो त्याच बरोबर शेकडो हेक्टर शेतीतील पिके उध्वस्त होत आहे यामुळे या परिसरातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.या शक्तीपीठ महामार्गा मुळे उर्वरीत काही गावासह कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती भागालाही महापुराचा फटका बसणार आहे त्याच बरोबर बागायती शेतीचेही प्रचंड नुकसान होणार आहे.तर हे सरकार स्वतःच्या लाभासाठी पोलिस यंत्रणेचा वापर करून जमीन मोजणी करण्याचा घाट घालत आहे.भविष्यात निर्माण होणाऱ्या आपत्ती पासून बचावासाठी शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहीजे. यासाठीच सरकार विरोधी सर्व पक्षीय संघटनेच्या वतीने प्रस्तावित १२ ही जिल्ह्यामध्ये चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता त्याचाच एक भाग म्हणून पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली गावच्या हद्दीत पंचगंगा नदी पुलाजवळ चक्काजाम आंदोलन करून सुमारे दोन तास रस्ता अडवण्यात आला.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी,शिवसेनेचे विजय देवणे,संजय पवार,रवी इंगवले, सचिन चव्हाण, माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार राजूबाबा आवळे,बाबासाहेब देवकर,रघुनाथ कांबळे,संदिप देसाई, राहूल देसाई यांनी आपली मनोगत व्यक्त केली.या वेळी शक्ती पीठ महामार्ग रद्द होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पांडुरंग सुबुद्दी देवो यासाठी 5 जुलै रोजी सर्व आंदोलक पंढरपूरात जाऊन पांडुरंगाला साकडे घालण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.पोलीस प्रशासनाच्या वतीने जिल्हा पोलिस प्रमुख योगेशकुमार गुप्ता याच्या उपस्थितीमध्ये एक अप्पर पोलिस अधीक्षक , दोन विभागीय पोलिस अधिकारी, पंधरा पोलिस निरीक्षक,दोन टास्क फोर्स,आपत्ती व्यवस्थापनाच्या दोन बोटी सह दोनशेहून अधीक पोलिस कर्मचारी तैनात होते तर महसुल विभागाच्या वतीने प्रांताधिकारी दिपक शिंदे, तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर,शिरोली मंडल अधिकारी सीमा मोरये,तलाठी महेश सुर्यवंशी याच्यासह महसुल कर्मचारी उपस्थित होते.महामार्गावर आंदोलन सुरू असतानाच बाधीत शेतकरी अजित पवार,बंडू पाटील , कलगौंडा पाटील,आणि तानाजी वाठारे यानी जल समाधी घेण्यासाठी पंचगंगा नदी पुलाकडे धाव घेतली आमच्या पिकाऊ जमीनी जर या रस्त्यात गेल्या तर आमचे कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे मग जगून काय उपयोग असा आक्रोश करत पुलावर चढून जलसमाधी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या या शेतकर्याना बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी रोखून धरत त्याना जलसमाधी घेण्यापासून परावृत्त केले संभाव्य धोका होऊ नये म्हणून पंचगंगा नदी पात्रात आपत्ती व्यवस्थापनाच्या दोन बोटी तैनात करण्यात आल्या होत्या.वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने सकाळी 11 वा.कागल पंचतारांकित वसाहत, आणि शिये उड्डाणं पूल,वाठार उड्डाणं पूल या ठिकानाहून वाहतूक वळवण्यात आली होती. त्यामुळे चक्काजाम आंदोलनात दरम्यान वाहतूक कोंडी झाली नाही.पण काही प्रवाशांना मात्र शिरोली ते तावडे हॉटेल दरम्यान तीन किलोमीटरचे अंतर पायी प्रवास करावा लागला.