शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ डॉक्टर्स असोसिएशन व रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवार दिनांक 29 जून रोजी सकाळी वाजल्यापासून दिवसभर श्री क्षेत्र पंढरपूरकडे आषाढी वारीसाठी निघालेल्या वारकरी दिंडी सोहळ्यातील पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार करून आरोग्यसेवा पुरविण्यात आली.सन २०१६ पासून दरवर्षी आषाढी वारी दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांना आरोग्यसेवा पुरवली जाते. यावर्षी निंबलक फाटा वाजेगाव (ता फलटण) येथे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.सदर तपासणी शिबिरामध्ये वारकऱ्यांचे जनरल चेकअप,रक्तदाब तपासणी,जखमी वारकऱ्यांची मलमपट्टी करण्यात आली.तसेच ज्या वारकऱ्यांमध्ये ताप,सर्दी,खोकला,उलटी,जुलाब,चक्कर येणे,थकवा,अशक्तपणा जाणवणे अशा लक्षणानुसार योग्य ते औषधोपचार करण्यात आले.सदर शिबिराच्या माध्यमातून शेकडो वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.सदर आरोग्य शिबिरामध्ये शिरोळ डॉक्टर्स असोसिएशनमधील डॉ.सतीश कुंभार, डॉ.चेतन राजोबा,डॉ.अमरसिहं माने देशमुख,डॉ.प्रिन्सकुमार रजपूत,डॉ. अनिरुद्ध सुतार,डॉ.उदय गावडे,डॉ.अतुल पाटील यांनी वारकऱ्यांची वैद्यकीय तपासनी केली.तर अरविंद चौगुले,शरद जाधव,निलेश कदम, रणजित आवळे,सागर आवळे यांनी वारकऱ्यांची मलमपट्टी व सेवासुश्रुषा केली.वारकऱ्यांचे आरोग्य तपासणी शिबीर यशस्वी होण्यासाठी शिरोळ डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सेक्रेटरी, सर्व पदाधिकारी तसेच डॉ.संदीप गायकवाड,डॉ कुलभूषण चौगुले,डॉ किशोर खामकर रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळचे अध्यक्ष तुकाराम पाटील,(भैय्या),सेक्रेटरी प्रा.के.एम.भोसले खजिनदार चंद्रकांत भाट,यांच्यासह सर्व सदस्य आणि महांकाली फार्मस्युटिकलचे प्रमुख संजय माने,महावीर मेडीकल्सचे पूजन शहा यांचे सहकार्य लाभले.