पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुलाची शिरोली येथील प्राथमिक विद्यामंदिर विलास नगर पुलाची शिरोली या प्रशालेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती शाळेच्या प्रांगणात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव सौ माधवी पाटील मॅडम या लाभल्या.तसेच प्रमुख अतिथी शाळेचे मुख्याध्यापक सी.पी. वाकरेकर हे लाभले
सर्वप्रथम छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज,राजमाता जिजाऊ,महाराणी सईबाई,महाराणी येसूबाई यांच्या वेशभूषेत आलेल्या सर्व मुलांना घेऊन वाद्यांच्या गजरात शालेय परिसरातून प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरी शाहू महाराज की जय, जाणता राजा अशा घोषणा देण्यात आल्या. ही प्रभात फेरी परत शालेय प्रांगणात आली यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ माधवी पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. तसेच प्रमुख अतिथी चंद्रकांत वाकरेकर यांचे हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंडलिक जाधव यांनी केले.पहिली ते नववी पर्यंतच्या सर्व गुणी विद्यार्थ्यांनी राजर्षी शाहू महाराजांविषयी भाषणे केली. तसेच लहू श्रावस्ती , सौ रोहिणी भोपळे यांनी आपल्या मनोगत आतून शाहू महाराजांच्या आठवणींना उजाळा दिला. अखेरीस अध्यक्ष माधवी पाटील यांनी केले. या महान राजा विषयी थोडक्यात व मार्मिक माहिती विद्यार्थ्यांना दिली.शाहू महाराजांची विचार आपल्या आचरणात आणावेत असे सांगितले.सदर कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन कुंडलिक जाधव सर व प्रदीप गुरव यांनी उत्कृष्ट केले. अखेरीस उपस्थित मान्यवर विद्यार्थी पालक यांचे आभार शाळेचे जेष्ठ शिक्षक श्री शशिकांत पाटील यांनी मानले व कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले.