नृसिंहवाडी / प्रतिनिधी
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात चालू वर्षातील पहिला दक्षिण द्वार सोहळा आज बुधवार दिनांक २५ जून रोजी दुपारी १ वाजून ५ मिनिटांनी संपन्न झाला.यामुळे भाविकांनी स्नान तसेच दत्त दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. पावसाने कोल्हापूर,सांगली आणि सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा दमदार हजेरी लावल्याने कृष्णा नदीच्या पाण्यात पुन्हा वाढ झाली. त्यामुळे पहिल्या चढत्या दक्षिण द्वार सोहळ्याची दत्तभक्तांना उत्सुकता लागून राहिली होती.उत्तरेकडून कृष्णा नदीचे पाणी श्रींच्या चणकमलावरून दक्षिण द्वारातुन बाहेर पडते. यावेळी स्नान करणे व दर्शन घेणे ही पर्वणी समजली जाते की.पर्वणी आज होणार हे समजल्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र गोवा राज्यातील हजारो भाविक व नागरिक सकाळपासून येथे आले होते.हा पर्वणी सोहळा दुपारी संपन्न झाला. यावेळी हजारोभाविकांनी कृष्णा नदीत स्नान तसेच दर्शनासाठी येथे गर्दी केली होती.जून महिन्याच्या अखेरीस प्रथमच नृसिंहवाडी मध्ये चालू वर्षातील पहिला दक्षिण द्वार सोहळा संपन्न झाला.भाविकांनी श्री गुरुदेव दत्तच्या गजरात दक्षिण द्वार सोहळ्यात स्नानाचा लाभ घेतला. दक्षिणद्वार सोहळ्याची माहिती इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे प्रसारित झाल्याने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणाहून भाविकांनी स्नान दर्शनासाठी हजेरी लावली. विशेषतःमहिलांनी स्नानासाठी गर्दी केली होती.भाविकांची गर्दी लक्षात घेता श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देवसंस्थान मार्फत जादा सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली होती. दरम्यान श्रींची उत्सवमूर्ती दर्शनासाठी प.पु.श्री नारायण स्वामी यांच्या मंदिरात ठेवण्यात आली आहे.या मूर्तीची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.दक्षिण द्वार पर्वणी निमित्त सकाळपासून श्री क्षेत्र नृसिंहवाडी भाविकांनी दुमदुमनून गेली होती.