पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
हद्दवाढीविरोधात पाण्याच्या टाकीवर चढून शौले स्टाईल आंदोलन करणाऱ्या १३ जणांना ताब्यात घेवून त्यांच्यावर शिरोली पोलिस गुन्हा नोंद केला आहे.
कोल्हापूर हद्दवाढीचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला असताना या हद्दवाढीविरोधात हद्दवाढीत येणाऱ्या सर्व गावात आंदोलन सुरू केले आहे. शिरोली पुलाची येथील ग्रामस्थांनी हद्दवाढ होऊ नये यासाठी शिरोली येथील पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीवर चढून हे शोले स्टाईल आंदोलन केले हे एक अनोखे आंदोलन केले त्यानुसार जिल्ह्यात दिनांक१४/०६/२०२५ रोजी सकाळी ०६.०० वा. पासून ते दिनांक २६/०६/२०२५ रोजी रात्री २४.०० वाजेपर्यंत बंदी आदेश लागु असताना युवा कृती समिती शिरोली पुलाची वतीने महाडीक बंगल्या समोरील मराठी शाळेजवळील सार्वजनिक पाण्याच्या टाकीवर चढून हददवाढ रद्द झालीच पाहिजे , “शिरोली आमच्या हक्काची, नाही कोणाचे बापाची”, “कोल्हापूर महानगरपलिकेचा निषेध असो”, “हद्दवाढ रद्द झालीच पाहिजे झालीच पाहिजे” अशा घोषणा देऊन विनापरवाना बेकायदेशीर एकजमाव करुन पोलीसांनी दिलेल्या सुचनांकड़े दुर्क्ष केल्याने निलेश श्रीरंग शिंदे , योगेश आनंदराव खाडे , गणेश विश्वास खोचीकर ,
विशाल सुनिल खोचीकर , श्रीपाद उत्तम रंगापुरे , विकी चंद्रकांत पाटील , श्रीकांत हिमत कदम , अदित्य ज्ञानेश्वर पाटील , राहुल संजय मोरे , विशाल चंद्रकांत मोरे , प्रथमेश प्रकाश देसाई ,शुभम मच्छिंद्र जाधव , लखन गोविंदराव घाटगे यांच्यावर शिरोली पोलिसात गुन्हा दाखल केला आहे