पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
जोतीबा देवाचे देवदर्शन घेवून घरी परतत असताना पती पत्नीचे कडाकाचे भांडण झाल्याने त्या रागात पतीने चाकूने भोसकून पतनीचा खून करून सादळे मादळे घाटात कासारवाडी गावच्या हद्दीत मृतदेह तेथेच टाकून पोबारा केला अन आज शुक्रवारी सकाळी सात वाजता स्वतःहून सोलापूर शहरातील फौजदार चौकीत हजर राहुन केल्या खुनाची माहीती दिली त्यानंतर सोलापूर पोलिसांनी शिरोली एमआयडीसी पोलिसांशी संपर्क करून घटनेची माहिती दिली तासाभराच्या प्रयत्नाने महिलेचा मृतदेह आढळून आला . मयत महिलेचे नाव शुभांगी सचिन रजपूत (वय २९ रा सध्या हनुमान नगर शिये ता करवीर मुळगाव गडिहग्लज ) असे असून आरोपी पती सचिन रजपूत (वय ३२ रा मुळगाव कलबुर्गी ता जमखंडी जि बागलकोट सध्या रा हनुमाननगर शिये ) असे आहे . त्यास ताब्यात घेण्यासाठी पथक सोलापूर ला रवाना झाले आहे.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,सचिन रजपूत व शुभांगी रजपूत हे शिये ता. करवीर येथील हनुमान नगर येथे काही दिवसापूर्वीच भाड्याच्या खोलीत राहण्यास आले होते. हे दोघेही गुरुवारी सायंकाळी ज्योतिबा दर्शनासाठी गेले होते. ज्योतिबा दर्शन घेऊन सादळे- मांदळे मार्गे घाटातून शिये कडे येत असता दोघांच्यात कडाक्याचे भांडण झाल्याने पती सचिन याने राघाच्या भरात चाकूने भोसकून तीचा कासारवाडी येथील घाटात खून करून पोबारा केलातेथून आपल्या खोलीवर जाऊन पुन्हा तो सोलापुरात गेला सोलापुरात पोलीस ठाण्यात जाऊन खुनाची काबुली दिली. सोलापूर पोलिसांनी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा व घटना कळविण्यात आली . यानंतर शुक्रवारी सकाळी शिरोली एमआयडीसी पोलीांसानी शोध सुरू केला. अकराच्या सुमारास महिलेचा मृतदेहाचा शोध लागला. मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापूर येथीलसरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला .. खुनी पती यास ताब्यात घेऊन शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पथक कोल्हापूर कडे रवाना झाले आहे. अधिक मिळालेली माहिती अशी यांचे लग्न दहा वर्षापूर्वी झाले होते पण बरेच वर्षे शुभांगी माहेर असलेल्या गडहिंग्लज जवळ असलेल्या गावात रहात होती तर सचिन चे मुळ गाव कर्नाटकात बागलकोट जवळ आहे. काही महिन्यांपूर्वी ते शिये येथील हनुमान नगर येथे भाड्याने खोली घेऊन रहात होते. या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली आहे. पुढील तपास स. पो. निरिक्षक सुनील गायकवाड करीत आहेत..