हातकणंगले / प्रतिनिधी
देशभक्त रत्लाप्पाण्णा कुंभार शिरोळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी, जयसिंगपूर च्या चेअरमन पदी हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने (बापू) व व्हा. चेअरमन पदी श्री. जितेंद्र चोकाककर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.संस्थेची सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी संचालक मंडळासाठी निवडणूक बिनविरोध पार पडली. मूख्य निवडणूक अधिकारी श्रीमती उज्वला पळसकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या चेअरमन, व्हाईस चेअरमन निवडीच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये संस्थेच्या चेअरमनपदी दलितमित्र आमदार डॉ. अशोकराव माने (बापू) यांची व व्हा.चेअरमन पदी श्री. जितेंद्र चोकाककर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेच्या प्रगतीमध्ये नेहमीच सभासद, संचालक आणि हितचिंतकांचे योगदान राहिले आहे. यापुढेही सर्वांच्या सहकार्याने संस्थेचा कारभार चालवण्याची ग्वाही यावेळी चेअरमन आमदार डॉ. अशोकराव माने यांनी दिली.यावेळी,संचालक, अनिल कांबळे, वसंतराव देशमुख, डॉ. अरविंद माने, चिंतामणी निर्मळे, विलास माने, बाबासाहेब मिसाळ, सदाशिव बन्ने, अमरसिंह धुमाळ, नानासाहेब राजमाने, सुहास बोंद्रे, संचालिका, सौ. रेखा अशोकराव माने, श्रीमती इंदूमती दिनकर माने उपस्थित होते.या निवडणूक प्रक्रियेमध्ये अनमोल सहकार्य करून निवडणूक बिनविरोध पार पाडल्याबद्दल सर्व संचालक, सभासद, हितचिंतक, अधिकारी, कर्मचारी यांचे व्हाईस चेअरमन जितेंद्र चोकाककर यांनी आभार मानले.