महाराष्ट्र पत्रकार संघाचे २१ वे अधिवेशन उत्साहात संपन्न

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

 

महाराष्ट्र पत्रकार संघाच्या २१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधन आयोजित करण्यात आलेले राज्यस्तरीय अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा अतिग्रे येथील संजय घोडावत विद्यापीठात भव्य उत्साहात पार पडला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून कार्यक्रमास विशेष रंगत आणली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत वृक्ष आणि कोल्हापुरी फेटा बांधून, हलगीच्या गजरात सन्मानपूर्वक करण्यात आले. विविध क्षेत्रांतील मान्यवर व कर्तृत्ववान पत्रकारांना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमात पत्रकारितेच्या समोरील आव्हाने आणि विश्वासहर्ता यावर बोलताना प्रमुख वक्ते किरण सोनावणे म्हणाले, पत्रकार हा समाजाचा सजग प्रहरी आहे. तो केवळ घटना सांगत नाही, तर समाजाची दिशा ठरवतो. अशा पत्रकारांचे मनोबल उंचावणारे उपक्रम काळाची गरज आहेत.

 

 

कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी पत्रकार व पोलीस यांच्यातील समन्वयाच्या गरजेवर भर दिला.सकारात्मक कामांची दखल घेऊन समाजात विश्वास निर्माण करण्याचे काम पत्रकारांनी करावे, असे ते म्हणाले.खासदार धैर्यशील माने यांनी स्पष्ट शब्दांत पत्रकार हा समाजाचा आरसा असून लोकशाहीच्या बळकटीसाठी पत्रकारितेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद केले. माजी आमदार सुजित मिणचेकर, माजी आम राजू किसनराव आवळे, तसेच के डी सी बँक संचालक विजयसिंह माने,माणगांव सरपंच राजू मगदूम, पोलीस उपअधीक्षक सदानंद सदाशिव, राज्य कार्यकारणी सदस्य पंढरीनाथ बोकारे, राज्य कार्यकारणी सदस्य राजकुमार चौगुले, जिल्हा उपाध्यक्ष रमेश बोभाटे, ज्येष्ठ पत्रकार माजी नगरसेवक मोहन हवालदार, आदींचीही उपस्थिती होती.

 

 

 

राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी संघटनेच्या स्थापनेपासूनचा प्रवास उलगडत सांगितले की, २००४ मध्ये स्थापना झालेल्या आणि पहिले अधिवेशन कोल्हापुरातून सुरुवात झालेल्या या संघटनेच्या २१ व्या अधिवेशनाची यजमान पद कोल्हापूर जिल्ह्याला मिळणं ही अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्र पत्रकार संघाची कोल्हापुरातील जिल्हा शाखा अतिशय सक्षम आणि कर्तव्यदक्ष आहे.

 

 

यावेळी पत्रकार सुनिल कांबळे यांची राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अनिल उपाध्ये, राज्य उपाध्यक्ष सुनील कांबळे, राज्य कार्यकारणी सदस्य राजकुमार चौगुले यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.या वेळी जिल्हा उपाध्यक्ष रमेश बोभाटे, तालुका अध्यक्ष पापालाल सनदी, पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, आयुब मुल्ला, भगवानराव पोळ, याचे सह मान्यवर उपस्थित होते.

 

 

यावेळी पत्रकार आयुब मुल्ला यांना राज्य शासनाचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला होता, तसेच जय कराडे यांना राष्ट्रीय चॅनलचा पुरस्कार मिळाला होता याबद्दल या दोघांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.या वेळी सत्कारमूर्तीना कोल्हापुरी फेटा, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्यातून आलेल्या महाराष्ट्र पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि सदस्य यांचा महाराष्ट्र पत्रकार संघ कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने ‘लोकराजा छत्रपती शाहू महाराज’ यांची प्रतिमा आणि शाहूंची ऐतिहासिक वास्तूंचे सचित्र प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आला.

 

 

 

 

कार्यक्रमासाठी भव्य हॉल, अद्ययावत ध्वनीव्यवस्था, आरामदायक बैठक व्यवस्था यामुळे सर्वांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाराष्ट्र पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी, पत्रकार बांधव व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. आभार राज्य संपर्कप्रमुख बाबासाहेब राशिनकर यांनी केले.

 

 

श्री शिवाजी शिंदे, श्री शशिकांत शामकांत भावसार,सौ. यमुना अमोल शिवतरे, ॲड. मंगेश नेने, श्री संभाजी पाटील, पत्रकार युनूस आयुब शेख,संपादक अयुब पठाण,श्री सागर मलगुंडे, डॉ. विजयकुमार कांबळे,श्रीमती शैला बैसाणे,श्री भानूविलास पुंडलिक भावसार,डॉ. अविनाश सहदेव बनगे,सौ. मंगल आप्पासो मगदूम,श्री राजुल अनिल लाईन्सवाला, श्री संजय भगत, पत्रकार श्री रोहन जिन्नाप्पा देसाई, पैलवान वसंतराव पाटील,श्री प्रताप शिरतोडे,श्री लक्ष्मीकांत शिवाजीराव काळे, श्री सुरेश मार्कड,श्री पोपट नलावडे,श्री सुर्यकांत भोसले,श्री मदन पवार, श्री संपतराव विष्णू डोंगरे व सौ. कमलबाई संपतराव डोंगरे,श्री ज्ञानेश्वर पांडूरंग भालेराव,श्री किरण भानुदास वाळके,श्री गणेश साहेबराव शिंदे,श्री भास्कर सदावर्ते,श्रीमती उषा सुरेंद्र नांदोडे,ज्ञानेश्वर सुपडू पाटील व सौ. रेवाबाई सुपडू पाटील,श्री विवेककुमार अनिलकुमार पाठक,ॲड. अनिशा फणसळकर,श्री विजय आत्माराम राऊत,श्री राजेंद्र श्रीपती काळे, श्री बबनराव गंगाराम धायगुडे, श्री रुपेश भानुदास भडकुंबे,श्री मदन पाटणकर,डॉ. मुकुंद सुखदेव लोंढे,श्री श्रेणीक प्रकाश पारखे, श्री राजेंद्र ज्ञानदेव फाळके, प्रा. डॉ. अहिल्या विठ्ठल वाघमोडे (गोफणे ), पत्रकार रमेश बोभाटे यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले.

error: Content is protected !!